पुणे : पुण्यात पुन्हा हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे.पुण्यात अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच आता कोरेगाव पार्क भागातील एबीसी फार्म रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव ऑडी कार चालकाने दोन दुचाकींना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या धडकेत एका दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात दुसऱ्या दुचाकीवरील तीन तरुण जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १.३० ते .३५ वाजण्याच्या सुमारासहा संपूर्ण प्रकार घडला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील एबीसी फार्म रस्त्याने मृत तरुण रौफ शेख मुंढव्याकडे निघाला होता. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने दोन दुचाकींना धडक दिली. त्यावेळी एका दुचाकीवरील तीन तरुण फेकले गेले. मात्र सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. त्यानंतर कार चालक आयुषने दुचाकीस्वार रौफला धडक दिली. मात्र या अपघातात रौफ गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच मुंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रौफला तातडीने खासगी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी कार चालकाला अटक केलं
तर अपघात करणारा कारचालक या घटनांनंतर फरार झाला होता. अपघात झालेल्या परिसरातील सीसीटिव्हीच्या माध्यमातून कारचा नंबर काढण्यात आला, त्यानंतर त्या कारचालकाचा मोबाईल नंबर काढून त्यावरून पत्ता मिळवण्यात आला आहे. या अपघाच प्रकरणातील कारचालकाचे नाव आयुष प्रदीप तयाल (वय ३४ वर्षे रा. हडपसर) याला पोलिसांनी त्याच्या घरातून ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.