सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 विश्लेषण

विधानसभा निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला 24x7 नियंत्रण कक्ष

डिजिटल पुणे    18-10-2024 10:09:06

मुंबई : आगामी महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक, 2024 दरम्यान पैशांचा  गैरवापर  रोखण्यासाठी मुंबई प्राप्तिकर विभाग वचनबद्ध आहे. मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आणि निवडणुकीचे पावित्र्य कायम राखण्यासाठी, 24x7 कार्यरत असलेल्या निवडणूक खर्च देखरेख यंत्रणेचा समावेश असलेला नियंत्रण कक्ष मुंबई प्राप्तिकर विभागाने स्थापन केला आहे.  आदर्श आचारसंहिता लागू असेपर्यंत हा नियंत्रण कक्ष कार्यरत राहील.  हा नियंत्रण कक्ष कर्तव्यनिष्ठ जनतेला आणि राज्यातील नागरिकांना निवडणूक प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रोख आणि मौल्यवान वस्तूंबद्दल माहिती देण्यासाठी सक्षम बनवेल. खालील टोल फ्री क्रमांक, व्हॉट्सॲप नंबर किंवा टेक्स्ट मेसेज क्रमांक आणि ईमेलद्वारे नियंत्रण कक्षाला माहिती देता येईल :

टोल फ्री क्रमांक: 1800-221-510

व्हॉट्सॲप किंवा टेक्स्ट मेसेज क्रमांक: 8976176276/ 8976176776

ईमेल आयडी: [email protected]

नियंत्रण कक्षाचा पत्ता: खोली क्र.  316, तिसरा मजला, सिंधिया हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-400001

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती