सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 विश्लेषण

‘बाबा सिद्दीकीपेक्षा वाईट हालत होईल’,सुपरस्टार अभिनेत्याला पुन्हा एकदा धमकी; कोट्यवधी रुपयांची मागणी

डिजिटल पुणे    18-10-2024 11:14:51

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खानला देखील अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्यात आलेली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या प्रकरणातील संपूर्ण तपासणी केल्यानंतर या हत्या प्रकरणात दिसणारी बिष्णोई गॅंगचा देखील हात असू शकतो. अशी शंका व्यक्त केली गेली. आणि त्यामुळेच अभिनेता सलमान खान देखील सतर्क झाला आहे. परंतु सलमान खानला आता आणखी एकदा ट्रॅफिक कंट्रोलला पाठवलेला एका मेसेजमध्येही धमकी देण्यात आलेली आहे.

ट्राफिक कंट्रोल रूमला एक मेसेज पाठवण्यात आला होता. त्या व्यक्तीने ती लॉरेन्स बिष्णोईची अगदी जवळची व्यक्ती असल्याचे सांगितलेले आहे. आणि त्या व्यक्तीने सलमान खानकडे 5 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्यानंतर आता सलमान खान हा बिष्णोई यांच्या निशाण्यावर आलेला आहे. त्यामुळे सलमानने त्याच्या सुरक्षितेत वाढ केली आहे. याआधी देखील सन्मान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. आणि त्याला अनेकदा जिवे मागण्याच्या धमक्या देखील देण्यात आलेल्या होत्या.

हाती आलेल्या माहितीनुसार मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हाट्सअप नंबर वरून हा मेसेज आला होता. या मेसेजमध्ये लॉरेन्स विष्णू गॅंगसोबत गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानचे जे वैर आहे ते संपवण्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली होती. हा मेसेज पाठविणाऱ्या व्यक्तीने असे म्हटले आहे की तो सलमान खान आणि लॉरेन्स यांच्यामध्ये सामंजस्य घडवून आणणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी पैसे मागितले आहे. परंतु जर हे सलमान खानने हे पैसे दिले नाही तर त्याची अवस्था बाबा सिद्दिकी पेक्षा देखील वाईट होईल असे सांगण्यात आलेले आहेत.

ट्राफिक पोलिसांच्या व्हाट्सअपनंबर वरून तो मेसेज आला त्या मेसेजमध्ये असे सांगण्यात आले होते की, “ही धमकी हलक्यात घेऊ नका, जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल. तर त्याला पाच कोटी रुपये द्यावे लागतील. पैसे दिले नाही तर सलमान खानची अवस्था बाबासाहेबांचे पेक्षाही वाईट होईल. या धमकीनंतर आता मुंबई पोलिसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले आहे. आणि हा असा मेसेज पाठविणाऱ्या व्यक्तीचा तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे. आणि सलमान खानच्या सुरक्षिततेतही वाढ करण्यात आलेली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती