सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 विश्लेषण

न्हावा शेवा सी.एच.ए. आधार सामाजिक संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी)    03-12-2024 14:00:24

उरण : उरण तालुक्यातील पूर्व विभागात अपघातात मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीला १०,००० रुपयाची आर्थिक मदत करणाऱ्या व सी.एच.ए (कस्टम हाऊस एजेंट )च्या सुख दुःखात नेहमी सहभागी होणाऱ्या न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेने आजपर्यंत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले असून सामाजिक बांधिलकी जपत दिनांक १/१२/२०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन, उरण येथे संस्थेतर्फे आयोजित केलेले भव्य दिव्य रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, मोफत चष्मे वाटप शिबीर मोठया उत्साहात संपन्न झाले.या शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.

या शिबिरात आर झूनझूनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल तर्फे डॉ. ओमकार पाटील, डॉ. सुदेश पाटील, टेक्निशियन अक्षता पार्टे, नेहा कदम, कॅम्प कोओर्डीनेटर - विजय बामने, रुचिता पाटील आदींनी २०१ रुग्णांची नेत्र तपासणी केली. व अनेक रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्र क्रिया देखील केली. तर पनवेल हॉस्पिटल (ओल्ड पनवेल )तर्फे डॉ. सुरेश करांडे, डॉ. आरती करांडे यांनी १०१ रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत मार्गदर्शन केले. विविध रोगाचे निदान केले. तेरणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नेरुळ नवी मुंबईच्या तेरणा ब्लड बँकेचे टेक्निशियन केसरीनाथ भगत, नितीन पाटील, सोशल वर्कर दत्ता राठोड तसेच समर्पण ब्लड बँक घाटकोपरचे सिस्टर शिला वाघमारे, डॉ. देवांशी, राजेश सोळंकी, सामाजिक कार्यकर्ते सुनिल वर्तक यांनी तरुणांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करून रक्तदानासाठी महत्वाचे सहकार्य केले.यावेळी या शिबिरात एकूण दोन्ही ब्लड बँकेचे मिळून १३६  रक्त दात्यांनी रक्तदान केले.

सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्हावा शेवा सी.एच.ए आधार सामाजिक संस्थेच्या सर्वच पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. एकंदरीत न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, मोफत नेत्र तपासणी शिबीर, मोफत मोतीबिंदू शस्त्र क्रिया शिबीर, मोफत चष्मे वाटप शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला.चांगल्या उपक्रमांचे आयोजन केल्याने जनतेने या उपक्रमांचे कौतुक करत न्हावा शेवा सी.एच.ए आधार सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले आहेत.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती