सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

सीएनजी-एलपीजी टँकरमध्ये भीषण धडक; ४ जणांचा होरपळून मृत्यू, ४० वाहनं जळून खाक

डिजिटल पुणे    20-12-2024 17:06:04

जयपूर :  जयपूरमध्ये एका सीएनजी आणि एलपीजी टँकरची धडक झाली होऊन भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या धडकेत दोन्ही वाहनांना आग लागली आहे. या अपघातानंतर लागलेल्या आगीत किमान सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर सुमारे ४० जण जखमी झाले आहेत. तर या आगीत सुमारे ४० वाहने जळून खाक झाली आहेत. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथे जवळच एक पेट्रोलपंप देखील होते. सुदैवाने तिथपर्यंत ही आग पोहोचल्याने मोठा अपघात टळला आहे. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या २० हून अधिक गाड्या घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान, सुरक्षेसाठी जवळचा रस्ता वळवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या जयपूरमध्ये पहाटेच्या सुमारास ही स्फोटाची घटना घडली आहे. अजमेर रोडवर सीएनजी गॅसने भरलेल्या टँकरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे सर्वत्र आगीचा भडका उडाला. तसेच या टँकरच्या शेजारी असणारे दुसरे काही वाहनेही जळून खाक झाले आहेत. या घटनेनंतर तात्काळ पोलिसांसह स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सध्या बचावकार्य सुरु असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर जयपूर-अजमेर महामार्ग तात्पुरता बंद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी जयपूर-अजमेर महामार्गावर एक केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला एका ट्रकने धडक दिली आणि त्यानंतर टँकरचा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती आहे.

या अपघातात १२ ते १५ जण भाजल्याने गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भांक्रोटा परिसरातील एका खासगी शाळेजवळ हा अपघात झाला. सीएनजीने भरलेल्या गॅस टँकरचा अचानक स्फोट होऊन आग लागली. त्यानंतर काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण करत टँकरच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या आणि फिरणाऱ्या ३० गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याच्या जवळच एक पेट्रोल पंप होता. पण सुदैवाने आग तिथपर्यंत न पोहोचल्याने मोठी घटना टळली आहे.

दरम्यान हा स्फोट इतका भीषण होती की आगीचं लोण दुरपर्यंत पसरले होते. त्यामुळे अजमेर रोडवरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती. त्यामुळे वाहनाच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या.

या भीषण दुर्घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सवाई मानसिंग हॉस्पिटलला भेट देत जखमींवर सर्वोतोपरी उपचार करण्याचे निर्देश दिले. जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातानंतर गॅस टँकरला लागलेल्या आगीत नागरिकांचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी ऐकून खूप दुःख झाले. घटनास्थळी प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवा पूर्ण तत्परतेने काम करत आहेत, असे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती