सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 तर्फे ग्रीन पुणे रॅलीचे आयोजन

डिजिटल पुणे    27-12-2024 13:05:50

 पुणे - पुणे शहर हरित करून प्रदूषण मुक्त करण्याच्या मोहिमेचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्द्देशाने  दाउदी बोहरा समाजाच्या वतीने आयोजित चौथे सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 तर्फे ग्रीन पुणेे रॅलीचे आयोजन रविवार, 29 डिसेंबर 2024 सकाळी सकाळी 9.00 वाजता  करण्यात आली आहे.

सदर ग्रीन पुणे रॅली पुणे कॅम्पपासून सुरुवात करून,  सोलापूर रोड, हडपसर, फातिमानगर, वानवडी, साळुंके विहार, एनआयबीएम, फाखरी हिल्स, एमजी रोड, लक्ष्मी रोड, डेक्कन, फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे विद्यापीठ रोड, बंड गार्डन रोड, कल्याणी  नगर, विमान नगर, डेक्कन कॉलेज ग्राऊंड येथे संपेल. 

ग्रीन पुणे रॅली मध्ये  10 कार आणि 60 बाइक्ससह ग्रीन पुणे कॅम्पेन आणि एक्स्पोचा प्रचार करणारे पोस्टर्स सह सहभागी होणार आहेत. 

सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 गेल्या तीन वर्षांपासून करित असून यंदा चौथे वर्ष आहे. सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 येत्या 4  जानेचारी 2025 पासून सुरु होत असून 6 जानेवारी पर्यंत चालणार आहे. सैफी बुरहानी एक्सपो पुणे 2025 व हरित पुणे मोहिम चा प्रचार व प्रसार करण्याच्या उ्द्देशाने  एक ग्रीन पुणे रॅली रविवार, 29 डिसेंबर 2024 रोजी  सकाळी 9.00 वाजता  आयोजित करण्यात आली आहे.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती