मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) निधन झाले. 2004-14 या काळात ते भारताचे पंतप्रधान होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शुक्रवारी होणारे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार असून, या बैठकीत माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव दिल्लीतील मोतीलाल नेहरू मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराबाबत काही महत्त्वाचे काय प्रोटोकॉल आहेत, त्यानुसारच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात.
पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराचा प्रोटोकॉल
देशाच्या माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी राज्य प्रोटोकॉलचे पालन केले जाते. यामध्ये त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या पदाचा गौरव करण्यात आला आहे. अंत्यसंस्कार करण्यापूर्वी माजी पंतप्रधानांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळले जाते. अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना 21 तोफांची सलामी दिली जाईल. माजी पंतप्रधानांच्या शेवटच्या दौऱ्यात सुरक्षा आणि प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जाते. याशिवाय लष्करी बँड आणि सशस्त्र दलाचे जवानही शेवटच्या प्रवासात सहभागी होतात. यादरम्यान ते पारंपरिक पदयात्रा काढतात.
कुठे होऊ शकतात अत्यंसंस्कार
देशाच्या माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील विशेष स्मारक स्थळांवर केले जातात. उदाहरणार्थ, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे अंत्यसंस्कार राजघाट संकुलात झाले. मात्र, अंत्यसंस्कार करण्याची पद्धत मृत व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांच्या धार्मिक समजुतीनुसार असते. माजी पंतप्रधानांचे अंत्यसंस्कार सहसा दिल्लीत होतात. काही वेळा अंत्यसंस्कार गृहराज्यातही होऊ शकतात. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव उद्या, 28 डिसेंबर रोजी काँग्रेस मुख्यालयात आणले जाईल, जिथे लोक त्यांना श्रद्धांजली वाहतील. त्यांच्या पार्थिवावर राजघाटाजवळ अंत्यसंस्कार करण्यात येणार येतील, अशी माहिती आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी माहिती दिली
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल म्हणाले, “देश आणि काँग्रेससाठी हा अत्यंत दुःखद दिवस आहे. ते या देशाच्या प्रशासकांपैकी एक होते. आम्ही आमचा महान नेता गमावला आहे.10 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात सुशासनाचे प्रदर्शन करणाऱ्या एका नेत्याला गमावणे हे देशाचे मोठे नुकसान आहे. “माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत आम्ही अधिकृतपणे घोषणा करू.” असंही त्यांनी यावेळी सांगितलं
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, “कार्यक्रम अद्याप ठरलेला नाही. त्यांना एक मुलगी आहे , त्या आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत परदेशातून भारतात येतील. त्यानंतरच सर्व काही ठरवले जाईल आणि अंतिम संस्कार होताल. उद्या, कदाचित सकाळी 9-10 नंतर, सर्वसामान्यांना दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल.”
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सरकारने आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. बेळगावी येथे होणारी सीडब्ल्यूसीची विशेष बैठक काँग्रेसने रद्द केली आहे. पक्षाचे सर्व नेते दिल्लीत पोहोचले आहेत.