सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

मनमोहन सिंग यांच्या अंतिमयात्रेला सुरुवात, सरकारी इतमामात होणार अंतिमसंस्कार -

डिजिटल पुणे    28-12-2024 11:31:23

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर संपूर्ण सैन्यदलाच्या इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यासाठी गृहमंत्रालयाकडून संरक्षण मंत्रालयाला विनंती करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची अंतिमयात्रा आज सकाळी 9:30 वाजता एआयसीसी मुख्यालयापासून स्मशानभूमीपर्यंत निघणार आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अखेरच्या प्रवासाला काँग्रेस मुख्यालयातून सुरुवात झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसच्या मुख्यालयात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरची श्रद्धांजली वाहिली.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल अमेरिकेचे (मावळते) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी शोक व्यक्त केला. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'कठीण काळात, पंतप्रधान सिंग यांनी आपले जीवन समर्पित केले होते. त्यासाठी आम्ही पुन्हा वचनबद्ध आहोत. जिल आणि मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि भारतातील सर्व लोकांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो".

देशाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी गुरुवारी रात्री निधन झाले. 2004 ते 2014 या काळात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये दोन वेळा पंतप्रधान राहिलेले सिंग यांची प्रकृती गेल्या काही महिन्यांपासून बिघडली होती. त्यांच्या पश्चात पत्नी गुरचरण सिंग आणि तीन मुली असा परिवार आहे.

डॉ. मनमोहन सिंह यांची कारकीर्द

डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली. सन 1966 ते 1969 या काळात मनमोहन सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं. नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 ते 1976 या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. 

1982 ते 1985 या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम केलं. त्यानंतर 1985 ते 1987 या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं. सन 1991 सालाच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांची अर्थमंत्रीपदी निवड करण्यात आली. अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करण्यात आलं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. सन 1996 साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर ड. मनमोहन सिंह यांनी देशाचे 13 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं. एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली.    

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती