सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

भारतात अखेर एचएमपीव्हीचा शिरकाव, आठ महिन्यांच्या बाळाला लागण, कुठल्या राज्यात पहिली केस?

डिजिटल पुणे    06-01-2025 12:21:36

बंगळुरू :  कोविड-19 च्या महामारीतून आता कुठे जग सावरले आहे. त्यातच चीनमध्ये पुन्हा एकदा धोकादायक व्हायरसने घातक रूप धारण केले आहे. ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस या नव्या व्हायरसचा प्रादुर्भाव चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत निघाला आहे. याच व्हायरसाचा परिमाण भारतातही दिसून आला आहे. भारतात पहिला रुग्ण बंगळुरूमधील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीमध्ये आढळला आहे. या व्हायरसने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले असून, यावर खबरदारीचे उपाय सुरू आहेत. तर चला या व्हायरसाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

HMPV व्हायरस –

ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा RNA (Ribonucleic Acid) व्हायरस असून, तो Pneumoviridae कुटुंबातील आहे. डच संशोधकांनी या व्हायरसचा शोध 2001 साली लावला होता. HMPV हा मानवी श्वासोच्छवासाच्या सिंसिटिअल व्हायरस आहे . म्हणजेच हा श्वसन संस्थेवर हल्ला करतो . तसेच हा रोग लहान मुलांमध्ये जास्त आढळतो. हा व्हायरस खोकला, शिंका किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरताना दिसला आहे.

HMPV व्हायरसाचा पहिला रुग्ण बंगळुरूमध्ये –

कोविड-19 नंतर भारतात आता HMPV या व्हायरसाचा एक रुग्ण आढळला आहे. बंगळुरूमधील एका रुग्णालयात आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV व्हायरस आढळला आहे. स्थानिक आरोग्य विभागात यावर उपाय योजना सुरू असून , ही चाचणी एका खासगी रुग्णालयाने केली जात आहे. HMPV मुळे सर्दी, खोकला, ताप, श्वसनास त्रास होणे, फुफ्फुसांमध्ये सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात. तसेच हा व्हायरस हिवाळ्यात जास्त प्रमाणात पसरत आहे. त्याचसोबत व्यक्तीला साधारण 3 ते 5 दिवसांपर्यंत लक्षणे जाणवतात. सध्या या व्हायरसवर ठोस उपचार उपलब्ध नाहीत.

आरोग्य तज्ज्ञांकडून खबरदारीचा इशारा –

तज्ज्ञांनी जनतेला खबरदारीचे उपाय घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये हात सारखे धुणे, मास्कचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून टाळणे आणि सार्वजनिक स्वच्छता राखण्यास सांगितले आहे. हि दक्षता बाळगल्यास लवकरच यावर तोडगा निघेल. त्यामुळे सर्व लोकांनी याची काळजी घेणे गरजेचे आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती