सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

राज्यात थंडीचा कडाका!! तर या भागात अवकाळी पावसाची शक्यता; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

डिजिटल पुणे    07-01-2025 14:16:27

पुणे : सध्या हवामानामुळे होणारे बदल नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करत आहेत. आता उत्तर भारतातून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे राज्यात थंडीचा कडाकाही वाढत आहे. अशातच हवामान विभागाने, पुढील दोन-तीन दिवसांत तापमानात आणखी घसरण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर यासह हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. 

हवामानाने बांधलेल्या अंदाजामुळे आता शेतकऱ्यांना अवकाळी पावसाची चिंता सतावू लागली आहे. नुकताच हवामान विभागाने मराठवाडा, मध्य व उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे पडलेल्या थंडीमुळे आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची अधिक शक्यता आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसू शकतो.

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी मुंबईत १३ अंश तर पुण्यात १३.८ अंश तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत पारा १२ अंशांच्या खाली गेला आहे. विदर्भातील नागपूर (११.२), अमरावती (११.९), गोंदिया (११.४), आणि गडचिरोली (१२.०) येथेही थंडीची तीव्रता जाणवली. नाशिक (१४.७), कोल्हापूर (१६.१), सोलापूर (१७.२), आणि सातारा (१२.८) यासारख्या ठिकाणीही थंडी वाढली आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस पडला तर याचा थेट परिणाम पिकांवर होऊ शकतो.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती