सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

सैफ अली खान नाही तर, चिमुकल्या जेहला ओलीस ठेवण्याचा होता प्लॅन,आरोपीकडून धक्कादायक खुलासे

डिजिटल पुणे    20-01-2025 15:49:46

मुंबई : सैफ अली खान वर तीन दिवसांपूर्वी त्याच्या घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आरोपी मोहम्मद शहाजाद याला पोलिसांनी पकडले असून त्याच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार आरोपीचा मुख्य टार्गेट सैफ नसून त्याचा लहान मुलगा जेह असल्याचे उघडकीस आले आहे.

आरोपीचा ‘रेकी प्लॅन’ 

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने वांद्र्यात राहणाऱ्या अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती. अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खान यांच्या घरांसह अन्य काही घरांची हेरगिरी आरोपीने केली होती. वांद्र्यातून प्रवास करताना रिक्षाचालकाकडून या सेलिब्रिटींच्या घरांची माहिती आरोपीने गोळा केली होती.सैफ अली खानच्या घरात घुसणे तुलनेने सोपे वाटल्याने आरोपीने ते घर निवडले.

सैफच्या मुलाला ओलीस ठेवण्याचा कट

आरोपीने सैफचा मुलगा जेह (जहांगीर) याला ओलीस ठेवून पैशांची मागणी करण्याचा कट रचला होता. मात्र, त्याचा हा डाव फसला. घरातील सर्व सदस्य जागे झाल्याने घाबरलेल्या आरोपीने सुटकेचा प्रयत्न करत अंधाधुंद वार केले. सैफवर तब्बल 6 वार करून तो घटनास्थळावरून फरार झाला.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती