सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

धक्कादायक!! महाकुंभमेळ्यात झालेल्या भीषण स्फोटाची खलिस्तानी संघटनेने स्वीकारली जबाबदारी

डिजिटल पुणे    22-01-2025 15:25:48

प्रयागराज : प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात रविवारी संध्याकाळी मोठा सिलेंडर स्फोट झाला होता. या स्फोटाची जबाबदारी खलिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. संघटनेने काही प्रसारमाध्यमांना ई-मेलद्वारे हा स्फोट पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचे सांगितले आहे. तसेच, हा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिलेला इशारा असून ही केवळ सुरुवात आहे, असेही संघटनेने म्हणले आहे.

काय घडले नेमके?

रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास सेक्टर 19 मधील गीता प्रेसच्या कॅम्पमध्ये अचानक सिलेंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत 200 हून अधिक तंबू आणि झोपड्या जळून खाक झाल्या. प्राथमिक माहितीनूसार, चहा तयार करत असताना सिलेंडर गळती झाल्यामुळे आग लागल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते. मात्र, आता खलिस्तानी संघटनेने हा स्फोट घडवून आणल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे महाकुंभात भीतीचे वातावरण पसरले आहेत.

संघटनेचा दावा

खलिस्तान जिंदाबाद फोर्सने पाठवलेल्या ई-मेलमध्ये हा हल्ला पिलीभीत एनकाऊंटरचा बदला असल्याचे म्हणले आहे. कारण, गेल्या 23 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशच्या पीलीभीत जिल्ह्यात पोलिसांनी तीन खलिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारले होते. या तिघांवर देखील पंजाबमधील एका पोलिस चौकीवर ग्रेनेड हल्ला केल्याचा आरोप होता. यूपी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर ही कारवाई केली होती.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती