मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटना ऐकायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा मुंबईत 54 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली. मुंबईत घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री (1 फेब्रुवारी) हरिद्वारहून ५५ वर्षीय महिला तिच्या नातेवाइकासह वांद्रे टर्मिनस येथे उतरली. त्यानंतर तिचे नातेवाईक काही कामानिमित्त स्टेशन बाहेर गेले. त्यावेळी ती प्लॅटफॉर्म थोडा वेळ झोपली होती. मात्र झोप अनावर होत असल्याने ती समोर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये जाऊन झोपली. त्या वेळी त्या ठिकाणी काम करत असलेल्या हमालाने तिला पाहिले.
रात्री एक वाजता २७ वर्षीय व्यक्ती आला. त्याने गुपचूप पीडितेला उठवले तिकिट तपासण्याचा नावाखाली मला दूर नेलं. चौकशी करू लागला अन् जबरदस्तीने एक्सप्रेस ट्रेनमध्ये ढकलले अन् अत्याचार केला. त्यानंतर हमाल तिथून पळून गेला. महिलेने आपल्यासोबत घडलेली घटना मुलाला आणि नातेवाईकांना सांगितली. त्यानंतर सर्वांनी वांद्रे जीआरपी स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीची ओळख पटवली अन् त्याला बेड्या ठोकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी स्टेशनवर हमाल म्हणून काम करत होता. आज (3 फेब्रुवारी) आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. एक्सप्रेस ट्रेनचे केबिन कसं उघडं राहिलं? त्याचा तपास करण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हमालाविरुद्ध गुन्हा दाखल
वांद्रे टर्मिनसवर उतरल्यानंतर ती महिला दुसऱ्या ट्रेनमध्ये का चढली हे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी पोर्टरविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जर मुंबईसारख्या शहरात स्टेशनवरही महिला सुरक्षित नसतील तर इतर शहरांमध्ये त्यांची काय अवस्था असेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.
गेल्या महिन्यात मुंबईत एका ऑटो चालकाविरुद्ध महिलेवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अलिकडेच मुंबईतील दिंडोशी भागात एका २० वर्षांच्या मुलाने ७८ वर्षांच्या वृद्ध महिलेवर अत्याचार केला. सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृद्ध महिला घरात एकटीच होती. वृद्ध महिला झोपली असताना आरोपी घरात घुसला आणि महिलेवर बलात्कार करून पळून गेला.