पुणे : मोहिते टाऊनशिप आयोजित होळीचा सण अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात आज संपन्न झाला .काल संध्याकाळी होळी पेटवून सर्व दुष्ट प्रवृत्तींना जाळून टाकण्याचा निश्चय करत ,आज सकाळी विविध रंगाचे रंग उधळत लहान मुलांपासून ते मोठ्याने सर्वांनी होळी अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात साजरी केली .



यामध्ये लहान मुलांनी एकमेकांच्या अंगावर रंग उडवत तसेच मोठ्यांनी देखील एकमेकांना रंग लावत अतिशय प्रसन्न अशा वातावरणामध्ये होळीचा सण साजरा केला होळी म्हणजे एकतेचे प्रतीक ,होळीच्या निमित्ताने सर्व लहान मोठे एकत्र येऊन विविध रंग एकमेकात मिसळून एक उत्साहवर्धक असं एक वेगळ्या वातावरण तयार करत होळी साजरी करतात .तसेच होळी मोहिते टाऊनशिप मध्ये करण्यात आली.


यावेळी अभिजीत डोणगावकर, मीनल डोणगावकर, सदानंद कुलकर्णी, पद्मजा कुलकर्णी मिलिंद पाठक ,सौ पाठक ,अवधूत कुंटे सौ कुंटे ,डॉक्टर शशिकांत कदम, मुकुंद देशपांडे सौ. अनुजा देशपांडे, प्रवीण कुलकर्णी, शार्दुल वझे ,श्री. पाटील, सौ स्नेहा पाटील तसेच मोहिते टाऊनशिप मधील मुला मुलींनी सहभाग घेतला . कार्यक्रमाचे आयोजन सदानंद कुलकर्णी व अभिजीत डोणगावकर यांनी केले.