सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 विश्लेषण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासोबत साजरा केला धुलिवंदनाचा उत्सव

डिजिटल पुणे    14-03-2025 16:22:33

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली. या वेळी बोलताना त्यांनी सांगितले की, "गेल्या दोन-दीड वर्षांपासून आम्ही महाराष्ट्रात आनंद पसरवत आहोत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मी राज्य अधिक सुखी करण्यासाठी काम करत आहोत." शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याशी फोनवर संवाद साधल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी कुटुंबासोबत त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी धुलिवंदनाचा उत्सव साजरा केला. भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा नाही. ज्यांना भगव्या रंगासोबत यावे वाटत आहे. त्यांनी आमच्या सोबत यावे असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

धुलिवंदन निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी, त्यांच्या पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यांच्यासोबत एकनाथ शिंदे यांनी धुलिवंदन साजरी केली. यावेळी त्यांचे नातेवाईक, पदाधिकारी हे देखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीवर जनतेने मतांचा वर्षाव केला. त्यामुळे नागरिकांच्या जीवनात आम्ही आनंदाचे सप्तरंग उधळण्याचे प्रयत्न करू असे शिंदे म्हणाले. भगवा रंग हा हिंदुत्त्वाचा आहे. भगवा रंग कोणाचा द्वेष करणारा नाही. ज्यांना भगव्या रंगासोबत यावे वाटत आहे. त्यांनी आमच्या सोबत यावे असे एकनाथ शिंदे म्हणाले. भगव्याकडील ओढा आणखी वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे आमच्यासोबत येत आहेत. त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत असे ते म्हणाले. देश आणि राज्य पुढे जात आहे. आम्ही फक्त विकासाचा सप्तरंग उधळत आहोत. विकासाच्या सप्तरंगात विरोधकांनीही सोबत यावे असे ते म्हणाले. विरोध पक्षाकडे संख्याबळ नसले तरी त्यांना आम्ही कमजोर समजत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाके असल्याचे त्यांनी सांगितले.

धुलिवंदन साजरी करण्यापूर्वी गुरुवारी रात्री होळी निमित्ताने एकनाथ शिंदे हे कुटुंबासोबत वागळे इस्टेट येथील किसननगर भागात होळी दहन करण्यास उपस्थित होते. होळीमध्ये दुःख, निराशा, नकारात्मकता असे सारे या पवित्र अग्नीत दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, निरोगी आरोग्य, शांती व सकारात्मक उर्जा मिळावी अशी प्रार्थना यावेळी त्यांनी केली.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती