सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • परिस्थिती हातळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस
  • अफवावर विश्वास ठेवू नका ,कायदा.हातात घेवू नका,समाज कंठक याचा फायदा घेत आहेत
  • नागपूरात महाल परिसरात दोन गटात दगडफेक ,जाळपोळ ,दगडफेकीत पोलीस जखमी
  • पोलीस कर्मचारी जखमी
  • औरंगजेबाच्या कबरी वरून वाद
  • पोलीसांचा फौज फाटा दंगल स्थळी दाखल
  • मुख्यमंत्री फडवणीस यांनी केले शांततेचे अवाहन
  • नागपूरात महाल दोन गटात दगडफेक ,जाळपोळ ,दगडफेकीत पोलीस जखमी
 विश्लेषण

धक्कादायक! लाडकी बहीण योजनेचे पैसे दारुवर उडवले; जाब विचारणाऱ्या बायकोवरच कोयत्याने हल्ला, गुन्हा दाखल

डिजिटल पुणे    17-03-2025 16:33:59

सोलापूर : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत निर्णयात्मक ठरली. लाडक्या बहि‍णींमुळे राज्यात महायुतीचं सरकार बहुमताने प्रस्थापित झाल्यान महायुतीमधील तिन्ही पक्षाचे प्रमुख समाधानी आहेत. मात्र, लाडकी बहीण योजनेची स्क्रुटीन सुरू करण्यात आली असून फोर व्हिलर असलेल्या कुटुंबातील महिलांची नावे वगळण्यात येत आहेत.एकीकडे ही योजना महिलांना आर्थिक बळ देत असल्याने योजनेचं कौतुक होत असताना, दुसरीकडे या योजनेतून महिलांना मिळणाऱ्या पैशांची मागणीही काही दारुड्या नवऱ्यांकडून महिलांना होत आहे. त्यातून घरगुती कलही निर्माण झाल्याचं पाहायाला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात अशीच एक घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

 महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या निधीवरून अनेक कुटुंबांत वाद होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना सोलापूरच्या माढा तालुक्यात घडली आहे. मिळालेल्या पैशांबद्दल विचारणा केल्याने पती आणि सासूने पत्नीवर कोयत्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? :

माढा तालुक्यातील लोणी येथे राहणाऱ्या निशा लोंढे (पीडित महिला) यांना सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे मिळाले होते. मात्र, त्यांचा पती धनाजी लोंढे याने हे पैसे परस्पर काढले.पत्नीने हे पैसे काढल्याबद्दल विचारणा केली असता, नवरा आणि सासूने वाद घालण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर थेट कोयत्याने हल्ला केला.

 पत्नीवर थेट कोयत्याने हल्ला :

पत्नी “माझे पैसे तुम्ही का काढले?” असा जाब विचारताच, नवऱ्याने वाद घालण्यास सुरुवात केली. सासू रूपाबाई लोंढेही या वादात सहभागी झाली आणि दोघांनी मिळून निशाला बेदम मारहाण केली.हल्ल्यात निशा गंभीर जखमी झाली असून तिच्या पाय, गुडघा आणि हातावर कोयत्याने वार करण्यात आले. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर माढा पोलीस ठाण्यात पती धनाजी लोंढे आणि सासू रूपाबाई लोंढे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेच या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल रोपळे करत आहेत.

लाडक्या बहिण संदर्भात आम्हाला आपुलकी आहे. पण, काहींची गांडूळासाखी अवस्था आहे, ते कोणत्या तोंडाने चालतं हे कळत नाही. ⁠पाच वर्षाचा वचननामा असतो, ⁠तो आम्ही देणार आहोत. ⁠तुम्ही तर कोर्टात गेले होते, ⁠तुम्ही तर चुनावी जुमला म्हणाले. ⁠आम्ही दोन शासन निर्णय काढले. लाडक्या बहिणींचे वय 60 ऐवजी 65 केले.  ⁠घाईगडबडीत काही भगिनींची अर्थिक परिस्थिती चांगली आहे, ⁠पंतप्रधान यांनी ही गॅस संदर्भात आवाहन केल्यानंतर लोकांनी परत केले होते, असे उदाहरण अजित पवारांनी दिले. तसेच, लाडकी बहीण या योजनेत आम्ही दुरुस्ती करणार मात्र बंद करणार नाही, असेही सांगितले.  

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती