सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 पूर्ण तपशील

टीम इंडिया मायदेशी कधी परतणार ? अखेर ती तारीख,ठिकाण आणि वेळ ठरली!

डिजिटल पुणे    03-07-2024 15:46:40

नवी दिल्ली :  भारतीय क्रिकेट संघ अजूनही बार्बाडोसमध्ये अडकला आहे. टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये अंतिम सामना खेळून T-20 विश्वचषक २०२४  चे विजेतेपद पटकावले. T -20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वर्ल्डकपवर आपलं नाव कोरल. संपूर्ण जगभरातून भारतीय संघावर कौतकाचा वर्षाव होत असून रोहित सेनेचे स्वागत करण्यासाठी देश सुद्धा चांगलाच आतुरला आहे. शनिवारी,२९ जून रोजी अंतिम सामना खेळला गेला.मात्र बार्बाडोसमध्ये सुरु असलेल्या चक्रीवादळामुळे भारतीय संघाला काही दिवस खबरदारी म्हणून तिथेच मुक्काम करावा लागला.मात्र आता टीम इंडिया भारतात कधी येणार याबाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. उद्या सकाळी ६ वाजता टीम इंडिया दिल्लीत पोहचणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

वादळामुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद करण्यात आले असून तेथे कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपल्या या जगज्जेत्या खेळाडूंना मायदेशी आणण्यासाठी बीसीसीआयने विशेष फ्लाइटची व्यवस्था केली. भारतीय खेळाडू मंगळवारी बार्बाडोस मधून निघून बुधवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीला पोहचतील असं बोललं जात होतं. मात्र आता या वेळेत सुद्धा बदल झाला आहे. त्यामुळे आता उद्या म्हणजे गुरुवारी सकाळी ५ ते ६ च्या दरम्यान टीम इंडियाचे चॅम्पियन खेळाडू भारतात परततील. भारतात आल्यानंतर मुंबईत एका ओपन बस मधून सर्व खेळाडूंची विजयी मिरवणूक सुद्धा काढली जाण्याची शक्यता आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारताचा विजय-

भारतीय संघाने  T-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने५९ चेंडूत सर्वाधिक ७६ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ २० षटकात८ विकेट गमावत १६९ धावाच करू शकला.अशा प्रकारे भारताने हा सामना ७ धावांनी जिंकला.

बीसीसीआयने टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस केले जाहीर

दरम्यान, बीसीसीआयने टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे.बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू आणखी मालामाल होणार आहेत. जय शाह ट्विटरद्वारे म्हणाले की, मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की, भारतीय संघाला आयसीसी पुरुष T-20 विश्वचषक जिंकण्यासाठी १२५ कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. भारतीय संघाने T-20 विश्वचषकात उत्कृष्ट खेळ, प्रतिभा, जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखवली. टीम इंडिया दुसऱ्यांदा T-20 वर्ल्ड कप चॅम्पियन बनली. यापूर्वी ICC ने सुद्धा भारतीय संघाला २० कोटींचे बक्षीस जाहीर केलं आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती