सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारतीय हॉकी संघाने जिंकले कांस्यपदक!! हॉकी इंडियाकडून सर्व खेळाडूंना प्रत्येकी 15 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर

डिजिटल पुणे    09-08-2024 12:22:52

पॅरिस : भारतीय हॉकी संघाने स्पेनविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार विजय मिळविला आहे. पॅरिस ऑलिम्पिक२०२४ स्पर्धेत भारत विरुद्ध स्पेनच्या हॉकीच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने २-१ अशा गुणाने स्पेनच्या संघाचा पराभव करत कास्य पदक पटकावलं आहे.कर्णधार हरमनप्रीत सिंह याच्या नेतृत्वात भारताने टोक्योनंतर आता पॅरिसमध्ये सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं आहे.

 कालचा भारताच्या हॉकी संघाचा सामना स्पेन विरुद्ध पार पडला. यामध्ये पहिल्याचं हाल्फमध्ये स्पेनने पहिला गोल केला आणि काही वेळासाठी भारतीय प्रेक्षकांना वाटले होते की, सामना हातातून निसटला. परंतु भारताच्या संघाने पहिल्या हाल्फच्या पहिल्या ब्रेकनंतर दमदार कमबॅक करत भारताच्या संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनॅलिटी कॉर्नरमध्ये भारतासाठी पहिला गोल केला. त्याचबरोबर भारताचा दिग्गज गोलकिपर पीआर श्रीजेशचा हा सामना शेवटचा सामना होता. भारताच्या संघाने दुसऱ्या हाल्फनंतर दुसरा गोल केला आणि टीम इंडियाला २-१ अशी लीड मिळाली. त्यानंतर भारताच्या संघाने शेवटपर्यत भारताला एकही गोल करू दिला नाही आणि भारताचा संघ सामना जिंकला.

भारताच्या हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करत भारतासाठी १० गोल केले आहेत.भारताच्या हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवले आहे, टोकियोमध्ये भारताने जर्मनीला पराभूत केले होते तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये टीम इंडियाने स्पेन ला पराभूत करून कांस्य पदकावर कब्जा केला.भारताची वॉल म्हणून पीआर श्रीजेशचे नाव पुढे केले जाते, त्याच्या या निवृत्तीच्या शेवटच्या सामन्यामध्ये भारतीय प्रेक्षक देखील भावुक होताना दिसले.भारताचा अनुभवी खेळाडू अमित रोहिदास याला क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये रेड कार्ड देऊन एक सामन्यासाठी बॅन करण्यात आले होते त्याने ब्रॉन्झ मेडल मॅचच्या सामन्यामध्ये पुनरागमन करून भारताला विजय मिळवून दिला.

 हॉकी इंडियाकडून सर्व खेळाडूंना प्रत्येकी १५ लाख रुपयांचे रोख बक्षीस

ऑलिम्पिक हॉकीच्या इतिहासात भारतीय संघाने मिळवलेले है चौथ कॉस्य पदक आहे. टोकयो ऑलिम्पिकनंतर लागोपाठ दुसऱ्या स्पर्धेत त्यांनी कांस्यची कमाई केली आहे. तर ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताच्या नावावर आता हॉकीत ८ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्य पदकं जिंकली आहेत. भारतीय कर्णधार हमनप्रीत सिंग गोलच्या बाबतीत या ऑलिम्पिकमध्ये सरस ठरला. आणि कांस्य पदकाच्या लढतीतही त्याने पेनल्टी कॉर्नरवर दोन गोल केले.या विजयानंतर हॉकी इंडियाने भारतीय संघातील प्रत्यैक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला १५ लाख रुपये देऊ केले आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती