सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 पूर्ण तपशील

पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने रचला इतिहास, 'इतकी' पदकं जिंकली अन् संपवली मोहीम

डिजिटल पुणे    09-09-2024 17:48:08

पॅरिस : ऐतिहासिक कामगिरीसह पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये भारताने आपला प्रवास संपवला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम केला आहे. भारताने एकूण २९ पदके जिंकली, ज्यात ७ सुवर्ण,९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे. याआधी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक १९ पदके जिंकण्याचा विक्रम केला होता, जो पॅरिसमधील पॅरा भारतीय खेळाडूंनी मोठ्या मोडला.

पॅरालिम्पिकच्या मागील दोन आवृत्त्यांमध्ये भारताने एकूण ४८ पदके जिंकली आहेत. तर मागील ११ आवृत्त्यांमध्ये भारताने केवळ १२ पदके जिंकली होती. गेल्या दोन आवृत्त्यांमधून खूप सुधारणा आणि बदल झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

पॅरिसपूर्वी, ५४ भारतीय खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भाग घेतला होता, जो त्यावेळी सर्वात मोठा संघ होता. त्यानंतर पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ही भारतीय तुकडी मोठी झाली. पॅरिसमध्ये एकूण ८४ पॅरा भारतीय खेळाडूंनी भाग घेतला आणि एकाच आवृत्तीत सर्वाधिक पदके जिंकण्याचा विक्रम करून इतिहास रचला.

टोकियो पॅरालिम्पिकपूर्वी भारताने केवळ ४ सुवर्णपदके जिंकली होती. आता फक्त पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने ७ सुवर्ण जिंकले आहेत आणि याआधी टोकियोमध्ये भारताच्या खात्यात ५ सुवर्ण जिंकले होते.

पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मधील भारताचे पदक विजेते

अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, महिला १० मीटर एअर रायफल (SH१)

 मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्य पदक, महिला १० मीटर एअर रायफल (SH१)

 प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची १०० मीटर शर्यत (T३५)

मनीष नरवाल (नेमबाजी) – रौप्य पदक, पुरुष १० मीटर एअर पिस्तूल (SH१)

रुबीना फ्रांसिस (शूटिंग) – कांस्य पदक, महिला १० मीटर एअर पिस्तूल (SH१)

प्रीती पाल (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिलांची २०० मीटर शर्यत (T३५)

निषाद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T४७)

योगेश कथुनिया (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष डिस्कस थ्रो (F५६)

नितेश कुमार (बॅडमिंटन) – सुवर्णपदक, पुरुष एकेरी (SL३)

मनीषा रामदास (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SU५)

तुलसीमती मुरुगेसन (बॅडमिंटन) – रौप्य पदक, महिला एकेरी (SU५)

सुहास एल यथीराज (बॅडमिंटन) – रौप्य पदक, पुरुष एकेरी (SL४)

शीतल देवी-राकेश कुमार (तिरंदाजी) – कांस्य पदक, मिश्र कंपाउंड ओपन

सुमित अँटील (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F६४ श्रेणी)

नित्या श्री सिवन (बॅडमिंटन) – कांस्य पदक, महिला एकेरी (SH६)

दीप्ती जीवनजी (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला ४०० मीटर (T२०)

मरियप्पन थांगावेलू (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुष उंच उडी (T६३)

शरद कुमार (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष उंच उडी (T६३)

अजित सिंग (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष भालाफेक (F४६)

सुंदरसिंग गुर्जर (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, पुरुष भालाफेक (F४६)

सचिन सर्जेराव खिलारी (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष शॉटपुट (F४६)

हरविंदर सिंग (तिरंदाजी) – सुवर्णपदक, पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह ओपन

धरमबीर (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुषांचा क्लब थ्रो (F५१)

प्रणव सुरमा (ॲथलेटिक्स) – रौप्य पदक, पुरुष क्लब थ्रो (F५१)

कपिल परमार (जुडो) – कांस्यपदक, पुरुष ६० किलो (जे१)

प्रवीण कुमार (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष उंच उडी (T४४)

होकाटो होतोजे सेमा (ॲथलेटिक्स) – कांस्य पदक, पुरुषांचा शॉट पुट (F५७)

सिमरन शर्मा (ॲथलेटिक्स) – कांस्यपदक, महिला २०० मीटर (T१२)

नवदीप सिंग (ॲथलेटिक्स) – सुवर्णपदक, पुरुष भालाफेक (F४१)

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती