सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 पूर्ण तपशील

टीम इंडियाचा फ्लॉप शो;भारत ४६ धावांत ऑलआऊट, ५ जण शून्यावर बाद

डिजिटल पुणे    17-10-2024 14:33:53

पुणे : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून खेळवला जात आहे. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चांगलाच अंगलट आला आणि संपूर्ण टीम इंडिया अवघ्या ४६ धावांवर गारद झाली. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची ही तिसरी सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे.

न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज मॅट हेन्री याने पाच आणि विल्यम ओ’रूकी याने चार विकेट घेत भारतीय फलंदाजांचे कंबरडे मोडले. न्यूझीलंडच्या घातक गोलंदाजीसमोर भारताचे पाच खेळाडू शून्यावर बाद झाले. या सामन्यातील पहिला दिवस पावसात वाहून गेला. यानंतरही कर्णधार रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे चुकीचा ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. कर्णधार रोहित ९ धावांवर बाद झाला. यानंतर विल्यम ओ’रूकने विराट कोहलीला शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. यानंतर हेन्रीने सर्फराज खानला बाद केले. सर्फराजला खातेही उघडता आले नाही.

न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली. भरवशाच्या फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. विराट कोहली, सर्फराज खान, लोकेश राहुल, रवींद्र जाडेजा, आर. अश्विन शुन्यावर बाद झाले. रोहित शर्मा 2, यशस्वी जैसवाल 13, ऋषभ पंत 20, जसप्रित बूमरा 1, कुलदीप यादव 2 धावा करून बाद झाले. भारताचा खेळ 31.2 षटकात 10 बाद 46 अशा निच्चांकी धावांवर आटोपला. न्यूझीलंडच्या विल ओराऊकी 5, मॅट हेनरी 4 व टीम साऊदीने 1 विकेट घेतली आहे.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती