सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना शरद पवार यांच्या हस्ते नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान;शरद पवार हे माझे आवडते नेते!

डिजिटल पुणे    15-06-2024 13:12:34

मुंबई : अशोक सराफ हे मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांतून, नाटकांतून विविध भूमिका साकारुन ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. कधी खळखळून हसावणाऱ्या तर कधी भावुक करणाऱ्या भूमिका त्यांनी साकारल्या. मराठीसह हिंदी चित्रपटांतही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केलं. नाटक, चित्रपट, मालिका यांमध्ये अनेक भूमिका साकारत त्यांनी कायमच सिनेसृष्टी गाजवली. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले. 

अशोक सराफ यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कामगिरीसाठी नेहमीच त्यांना पुरस्कार देत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. अशातच नुकताच अशोक सराफ यांना मानाचा पुरस्कार देत त्यांचा सन्मान करण्यात आला. मराठी रंगभूमीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींचा दरवर्षी नाट्य परिषदेच्या वतीने सन्मान केला जातो. यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले आहे.

“अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित नाटककार गो. ब. देवल स्मृतिदिन. जीवनगौरव पुरस्कार मा. अशोक सराफ यांना प्रदान”, असं कॅप्शन देत त्यांना हा पुरस्कार देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. हा पुरस्कार अशोक सराफ यांना मा. शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अशोक सराफ यांनी पुरस्कार घेण्यास गेल्यानंतर शरद पवार यांचे पाया पडत आशीर्वाद घेतले.

 शरद पवारांच्या हस्ते अशोक यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी अशोक सराफ यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी असंही म्हटलं की, “शरद पवार हे माझे आवडते नेते आहेत. लोकांना माझी कला आवडली, त्यामुळे मी काम करत गेलो. शरद पवारांच्या हस्ते पुरस्कार मिळाला याचा विशेष आनंद आहे. शरद पवारांकडे एकदा माझं एक काम होतं. त्यांनी फक्त तीन मिनिटांत ते काम केलं”.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती