सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

साधनप्रतिष्ठा (भाग २)

डिते नुमजताच उमजे | उमजोन काहीच नुमजे | ते वृत्तीविण पाविजे | निवृत्तीपद ||७/७/२४||जिटल पुणे    05-08-2024 10:32:52

साधनप्रतिष्ठा (भाग २)

ते नुमजताच उमजे | उमजोन काहीच नुमजे | ते वृत्तीविण पाविजे | निवृत्तीपद ||७/७/२४||

ब्रह्म काही समजत नाही असे आतून वाटते तेव्हा ते समजून जाते आणि मला ब्रह्म समजले असे ज्यास वाटायला लागते त्यास ते मुळीच समजलेले नसते. जेव्हा सर्व वृत्ति मावळतात तेव्हा निवृत्ती अवतरीत होते.

केनोपनिषदामध्ये एक मन्त्र आहे -

यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद स: |

अविज्ञातं विजानतां विज्ञातमविजानताम् ||२/३||

अर्थ – ज्याला वाटते मी ब्रह्म जाणले नाही, त्याने ते जाणलेले असते आणि ज्याला वाटते की मी ब्रह्म जाणले आहे, त्याने ते जाणलेले नसते. ब्रह्मज्ञानी मनुष्याला अमृतत्व प्राप्त होते, असे ब्रह्मज्ञानाचे फळ आहे.

ब्रह्म मी जाणतो हे देखील वृत्त्यात्मक ज्ञान आहे. जाणला जाणारा विषय आणि जाणून घेणारा असे दोघे तिथे उपस्थित आहेत. अजून द्वैत आहे. ब्रह्मज्ञान अव्दैताचा विषय आहे. द्वैत मिटले की त्याचा अनुभव येतो. ब्रह्माशी एकाकार झालेला कसा सांगणार की मी जाणले आहे म्हणून ? ब्रह्माचे ध्यान धरता येत नाही. कारण ध्यान करणे ही मनाची वृत्ती आहे. त्याचे चिंतन करता येत नाही कारण ते गुणरहित आहे. सांत, मर्यादित कक्षा असलेल्या मनात ते अनंत ब्रह्म सामावणे शक्य नाही.

पाण्याची उपमा ब्रह्माला अपुरी पडते. विश्व पाण्यात बुडेल, भिजेल पण ब्रह्म बुडू वा भिजू शकणार नाही. ते प्रकाश वा अंधारासारखे देखील नाही. मुळात आपल्याला ज्या विश्वाचा अनुभव आहे त्यातील कुठल्याच वस्तूसारखे ते नाही. मग त्याचे ध्यान लावणार तरी कसे ? यामुळे मनाला जे खरे स्वरूप आहे त्या ब्रह्माविषयी संशय येऊ लागतो. परब्रह्माला अस्तित्व नाही असे म्हटले तर वेदशास्त्राला, व्यासादिक ज्ञानी जनांना व त्यांनी निर्माण केलेल्या आत्मज्ञानाच्या साधनांना खोटे म्हणावे लागेल. जे योग्य होणार नाही.

श्रीशंकरांनी पार्वतीला गुरुगीतेचा उपदेश केला, गोरक्षनाथांना अवधूतगीता सांगितली, विष्णूने राजहंसाच्या रुपात ब्रह्मदेवाला हंसगीतेचा उपदेश केला. ब्रह्मदेवांनी श्रीनारदांना चतु:श्लोकी भागवत सांगितले ज्याचा व्यासांनी भव्य विस्तार केला, वसिष्ठांनी श्रीरामांना योगवासिष्ठ सांगितले, श्रीकृष्णाने अर्जुनाला सप्तश्लोकी गीता सांगितली. या सर्व ग्रंथात अद्वैताचा ज्ञानमार्ग सांगितलेला आहे. म्हणून आत्मज्ञान सत्य आहे. आत्मज्ञानामुळे येणारी स्वरूपस्थिती इतकी सूक्ष्म आहे की तेथे शेषाची बुद्धी देखील हार मानते. श्रुतींना मौन धरावे लागते. मला समजले असे म्हणून कोणी त्या स्थितीचे वर्णन करू शकत नाही. त्या स्थितीचे आकलन बुद्धीला होत नाही म्हणून ती नाही असे म्हणणे योग्य नाही. सद्गुरूच्या मुखाने त्याविषयी श्रवण करावे आणि तो विषय मनात दृढ धरून साधन करावे.

कथाव्यास (श्रीमद्भगवद्गीता, श्रीराम, श्रीहनुमान कथा) - श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती