सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वांद्रे रेल्वेस्थानकावर प्रवशांची चेंगराचेंगरी
  • पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर १ कोटीचा गुटखा जप्त
  • उद्धव ठाकरे व राज ठाकरे कधीही एकत्र येणार नाहीत: अमित ठाकरे
  • पुणे छानणी मधून सुनिल कांबळे
  • खडकवासल्यातून भीमराव तापकीर यांना भाजपाचे तिकीट
  • कसब्यातून भाजपाचे हेमंत रासने रिंगणात
 पूर्ण तपशील

गणेशोत्सवात अभिनेत्री वंदना गुप्ते यांचं बाप्पा स्पेशल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; ‘पार्वती नंदना’ अल्बम प्रदर्शित होताच म्हणाल्या, “आपल्या नातवाला…

डिजिटल पुणे    13-09-2024 14:47:17

मुंबई : गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया… घरोघरी बाप्पा विराजमान झाले असून संपुर्ण महाराष्ट्रात आनंदात आणि जल्लोषाचे वातावरण आहे. कुठे घराघरातून आरती आणि टाळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. तर कुठे चौका-चौका बाप्पाची गाणी लावली आहे. पार्वतीच्या बाळा, माझ्या गणाने घुंगरू हरवले, गणपती माझा नाचत आला अशी चिकमोत्याची माळ अशी गणपतीवरील लोकप्रिय गाणी दरवर्षी आपल्याला ऐकायला मिळतात. या गाण्यामध्ये आणखी एका गाण्याची भर पडली आहे ते म्हणजे ‘पार्वती नंदना’ हे गाणे.

अभिनेत्री वंदना गुप्ते यांचे बाप्पा स्पेशल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. वंदना गुप्ते आणि गायिका उत्तरा केळकर या जोडीचा ‘पार्वती नंदना’ हा सोलो अल्बम नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. या गाण्यात आजी आणि नातवाचं बाप्पाप्रती असलेले प्रेम दिसून येत आहे. कौतुक शिरोडकर यांच्या लेखणीतून सजलेल्या या गाण्याला गायिका उत्तरा केळकर, बालगायक आदित्य. जी. नायर यांचा स्वरसाज लाभला आहे. प्रवीण कुंवर यांचे संगीत आहे. गुरु नायर प्रॉडक्शन्स या अल्बमचे निर्माते आहेत. या गाण्याबद्दल बोलताना वंदना गुप्ते म्हणाल्या, पिढी मागोमाग पिढी बदलत जाते, काळ पुढे सरकत जातो. पण आपण अनुभवलेल्या एक एक गोष्टी पुढच्या पिढीच्या पदरात टाकताना अनुभवाचे गाठोडे अलगद सोडवावे लागते.

तरच त्या अनुभवाचा गोडवा पुढच्या पिढीला चाखता येतो. गणपती उत्सवाच्या याच आनंददायी सोहळ्याचे महत्त्व आपल्या नातवाला गाण्यातून समाजवणारी आजी या गाण्यात दिसणार आहे. गणेशोत्सव हा कुटुंबांना बांधणारा, नाती जवळ आणणारा, उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण करणारा सण आहे. हे गाणे करताना या सगळ्याचे समाधान नक्कीच जाणवले. कलेची आराधना ही गणपतीची आराधना केल्यासारखी असते, त्यामुळे एक छान गाणे गायला मिळाल्याचे उत्तरा केळकर यांनी म्हटले. तर चांगल्या टीमसोबाबत श्रीगणेशाचं गीत करण्याचा योग जुळून आला, हे गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास निर्माते गुरु नायर यांनी व्यक्त केला. कोणत्याही कामाची सुरुवात आपण गणेशाचे वंदन करुनच करतो. गणपती बाप्पाचा उत्सव हा आनंद व उल्हासाचे प्रतीक आहे. या दिवसात प्रत्येकामध्ये एक उत्साह पहायला मिळतो.

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती