सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 पूर्ण तपशील

न्हावा शेवा सी.एच.ए. आधार सामाजिक संस्था

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    22-10-2024 15:58:21

"न्हावा शेवा सी.एच.ए. आधार सामाजिक संस्था" 

 

देशाच्या दळणवळण प्रक्रियेतील आयात-निर्यात करणाऱ्या सर्वात मोठ्या पोर्टची अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची(JNPT)१९८९ साली उरण मध्ये स्थापना झाली, यामध्ये जवळपास अडीच ते तीन हजार छोट्या मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून आयात निर्यातीचे व्यवहार हाताळणाऱ्या कस्टम हाऊस एजंट (C.H.A) चे कार्य हे मोलाचे आणि धाडसी आहे.

 रजिस्टर्ड सी.एच.ए. एजन्सिजचा आकडा पाहिल्यास ३००० च्या वर C.H.A. आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या एजंटना दररोज वाहतुकीच्या संकटांशी सामना करत आपली नोकरी आणि घर सांभाळावे लागते. अश्यात रात्री-अपरात्री, ऊन-पावसात, खडतर रस्त्यातून प्रवासादरम्यान अनेक C.H.A बांधवांना मृत्युचा सामना करावा लागला आहे, लागत आहे. आणि अश्यावेळी कोणतीही प्रशासकीय यंत्रणा मदतीस उपयोगी पडत नाही.

 संकटात माणसाला काही सुचत नाही, मात्र "गरज ही शोधाची जननी आहे" असे म्हणतात म्हणून अश्या संकटांना सामोरे जाण्यासाठी शासकीय मदत मिळेल तेव्हा मिळेल परंतु आपणही आपल्या माणसासाठी काहीतरी करावे या उद्देशाने अपघातग्रस्थ C.H.A बांधवास किंवा त्याच्या कुटुंबियांस आपलीही मदत व्हावी या शुद्ध आणि प्रामाणिक हेतूने "भविष्य आपले आपल्या हाती, घडवू नवीन क्रांती" या संकल्पनेतून ०८ ऑगस्ट, २०१८ या दिवशी पिरकोन(उरण) च्या वाघेश्वर मंदिरात  "न्हावा शेवा C.H.A संघटना" या नावाने C.H.A बांधवांच्या हितासाठी एका नवीन संघटनेची स्थापना केली. बघता बघता २०१८ च्या वर्ष अखेरीस १६९ सभासद संख्या असलेल्या संघटनेचा डोलारा सहा वर्षांनी  ५३३ सभासद संख्येपर्यंत विस्तारित झाला.कालांतराने ही संस्था नोंदणीकृत करण्यामध्ये कार्यशील अध्यक्ष रुपेश भगत समवेत त्यांच्या कार्यकारिणीने त्यांना मदत करत ही संघटना नोंदणीकृत करून संघटनेचं नामांतरण "न्हावा शेवा सी.एच.ए. आधार सामाजिक संस्था" असे केले.मदतनिधी संकलनाच्या उद्देशाने आधार चषकाच्या माध्यमातून क्रिकेट सामने आयोजित करून तालुका आणि परिसरतील दानशूर व्यक्ती/संस्थांना मदतीचे आवाहन करत जमा झालेला मदतनिधी  अपघातग्रस्त C.H.A. बांधवांच्या कुटुंबियांना देण्याचे कार्य आजतागायत अविरत चालू होते आणि गेल्या वर्षभरापासून C.H.A बांधवांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त उरण पूर्व विभागातील C.H.A. बांधवा व्यतिरिक्त उरण पूर्व विभागातील अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना देखील मदत देण्याचे कार्य सुरू केले आहे त्याचप्रमाणे संस्थेच्या माध्यमातून या विभागात रक्तदान शिबिर,नेत्र चिकित्सा शिबिर,आरोग्य शिबिर तसेच विविध सामाजिक कार्ये केली जात आहेत.

वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी मदतनिधी संकलनासाठी आधार चषकाचे आयोजन केले जाते  या आधार चषकाच्या आयोजनाचा संपूर्ण खर्च C.H.A बांधव स्वतःच्या खिशातून करत आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक व्यवहार हे या संघटनेचे पदाधिकारी म्हणून काम केलेल्या आणि करत असलेल्या C.H.A बांधवांचे गुणवैशिष्ट्य असल्याने आधार चषकाच्या दरम्यान क्रिकेटला मदत म्हणून नव्हे तर आपल्याच समाजबांधवांच्या मदतीसाठी हा निधी उपयोगी पडतो या भावनेने दानशूर व्यक्ती -संस्था निःसंकोचपणे मदत करतानाचे चित्र पहावयास मिळते.या व्यतिरिक्त समाज आपल्या संघटनेवर विश्वास ठेवून डोळे झाकून जर मदत करत असेल तर त्या समाजाचेही आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने मार्च २०२३ पासून उरण पूर्व विभागातील २१ गावांमधील कोणत्याही व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस तात्काळ १०,००० हजार रुपयांची मदत आमची C.H.A संस्था करेल अशी घोषणा केली आणि आज तागायत १२ कुटुंबियांस ही मदत केली गेली आहे.

संघटनेत पद महत्वाचे नसून त्या पदाचे कार्य महत्वाचे असते म्हणूनच गेल्या दोन वर्षांपासून या संस्थेच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे रुपेश भगत असोत किंवा उद्या येणारे अन्य कोणी असोत, "संघटनेची प्रगती आणि C.H.A बांधव आणि समाजाला मदतीचा हात" हाच सर्वांचा  एकमेव उद्देश आहे आणि असेल यात शंकाच नसेल.अश्या या संघटनेत सहा वर्षे पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या सर्वांचा नावानिशी उल्लेख करणे शक्य नाही तरी सर्वांचे संघटना बांधणीसाठी आणि सहा वर्षे चालविण्यासाठी दिलेले योगदान फार महत्वाचे आहे.संघटनेत पैसा आणि पैशाच्या व्यवहारातील पारदर्शकता ही बाब महत्वाची आहे.अश्या या संघटनेस सर्व प्रकारचे सहकार्य आणि योगदान देण्यास कोणासही संकोच नसावा

माहिती संकलन आणि लेखन:- सुनिल वर्तक ( समालोचक,निवेदक )


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती