सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • भारताच्या हरविंदर सिंगला गोल्ड मेंडल
  • नाना पाटोळे आंदोलन स्थळी दाखला
  • पुतळा कोसळल्या प्रकरणी माफी मागतो : मुख्यमंत्री
  • पासपोर्ट ची वेबसाईट चार दिवस बंद राहणार, आज गुरूवार २९ ॲागष्ट ते २ सप्टेबंर सायंकाळी ६ पर्यत
  • आज जागतीक क्रीडा दिन
  • पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली ,दोन ते तीन वाहने वाहून गेल्या
  • शिवसेना समोर सकाळी ११ वाजता आंदोलन
  • वणी विधानसभेसाठी मनसेची राजू उंबरकर यांना जाहीर
  • राहूल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करा : सुब्रम्हनयम स्वामी
  • भारताला ॲालंपीक मधे कांस्य पदक
 पूर्ण तपशील

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला ‘गुलकंद’चा टिझर ;प्रथमच कपल म्हणून झळकणार सई ताम्हणकर- समीर चौघुलेची भन्नाट जोडी

डिजिटल पुणे    18-02-2025 15:33:24

पुणे : एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते, ज्यामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘गुलकंद’चा टीझर प्रदर्शित झाला असून प्रेक्षक आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. 

‘गुलकंद’च्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही  भन्नाट जोडी  पहिल्यांदाच एकत्र आली असून प्रसाद ओक - ईशा डे यांचीही अफलातून जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये ढवळे आणि माने जोडप्यांच्या नात्याचा प्रवास रेखाटला आहे. सई - समीरमधील गोड संवाद आणि प्रेमळ नाते दिसत आहे तर दुसरीकडे प्रसाद - ईशा  यांच्यातील गंमतीशीर नोकझोक दिसत आहे. हलक्याफुलक्या, गंमतीशीर प्रसंगांसोबतच प्रेमाची झलक देखील यात पाहायला मिळतेय.  संवादांची सहजता, पात्रांची केमिस्ट्री यामुळे प्रेक्षकांच्या मनात या फॅमकॉम चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रचंड वाढली असून टिझरच्या शेवटी प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांच्या नजरेने मात्र प्रेक्षकांच्या मनात प्रश्नही निर्माण केला आहे. त्यामुळे आता हा 'गुलकंद' किती मुरलेला आहे, हे १ मे रोजी प्रेक्षकांना चित्रपटगृहात कळेल. 

 सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारख्या तगड्या कलाकारांचा समावेश या चित्रपटात आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, " ‘गुलकंद’ हा चित्रपट म्हणजे प्रेम आणि नातेसंबंधातील गोडव्याचा एक अनोखा मनोरंजक प्रवास आहे. तुमच्या आमच्या घरातील ही गोष्ट असून यात दिसणारे हटके कपल्स आपल्याला अनेकदा आपल्या आजुबाजुला दिसतात आणि म्हणूनच ‘गुलकंद’शी प्रेक्षक सहज समरस होतील. बऱ्याच वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत असा एक फॅमकॉम चित्रपट येत आहे. 

प्रेक्षकांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारताना समीर चौघुलेला पाहिले आहे. मात्र, पहिल्यांदाच ‘गुलकंद’ मध्ये समीर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या टिझरमध्ये दाखवलेली ढवळे आणि माने कुटुंबातील जिव्हाळा रसिकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, याचा विश्वास आहे. हा चित्रपट प्रत्येकाला हसवतानाच त्यांच्या आयुष्यातील प्रेमाची गोड आठवण करून देईल."

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, "आम्ही नेहमीच वेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्रपट निर्मितीवर भर दिला आहे. गुलकंदाचे किमान १० आरोग्यदायी फायदे असतात, पण हा चित्रपट ११ व्या आणि सर्वात महत्वाच्या फायद्याबद्दल आहे तो म्हणजे आनंद! गुलकंदाप्रमाणेच गोड, सुगंधित व आरोग्यदायी असलेला हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि कौटुंबिक भावनेचा गोडवा मांडतो. हा चित्रपट जितका गोड आणि भावनिक आहे तितकाच प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ही आहे. सर्व तगड्या कलाकारांनी या चित्रपटाला एक वेगळीच उंची दिली आहे. टिझरमध्ये दाखवलेल्या दोन कपल्सच्या वेगळ्या नात्यांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल. काही खट्याळ प्रसंगासोबतच प्रेमाची नाजूक झलकही प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. विनोदाने भरलेला हा कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने नक्कीच एकत्रित पाहावा."


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती