सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • भारताच्या हरविंदर सिंगला गोल्ड मेंडल
  • नाना पाटोळे आंदोलन स्थळी दाखला
  • पुतळा कोसळल्या प्रकरणी माफी मागतो : मुख्यमंत्री
  • पासपोर्ट ची वेबसाईट चार दिवस बंद राहणार, आज गुरूवार २९ ॲागष्ट ते २ सप्टेबंर सायंकाळी ६ पर्यत
  • आज जागतीक क्रीडा दिन
  • पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली ,दोन ते तीन वाहने वाहून गेल्या
  • शिवसेना समोर सकाळी ११ वाजता आंदोलन
  • वणी विधानसभेसाठी मनसेची राजू उंबरकर यांना जाहीर
  • राहूल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करा : सुब्रम्हनयम स्वामी
  • भारताला ॲालंपीक मधे कांस्य पदक
 पूर्ण तपशील

'छावा'च्या गर्जनेने सर्व चित्रपटांना झटका! बॉक्स ऑफिसवर रचला नवीन विक्रम

डिजिटल पुणे    20-02-2025 17:58:36

मुंबई : विक्की कौशल, रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.हा ऐतिहासिक चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच सलग विक्रमी कमाई करत आहे आणि नवा विक्रम रचत आहे. पहिल्या दिवसापासूनच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व सिद्ध केले असून, आता सहाव्या दिवशीसुद्धा त्याची कमाई जबरदस्त राहिली आहे.सिनेमागृहात प्रेक्षकांचा उत्साह पाहता चित्रपटाच्या निर्मात्यांनाही आश्चर्य वाटत आहे. आतापर्यंत अनेक मोठ्या हिंदी चित्रपटांनी चांगली कमाई केली असली, तरी 'छावा' इतक्या वेगाने कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

'छावा' नं सहाव्या दिवशी किती कमाई केली?

छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांच्यावर आधारित 'छावा' या ऐतिहासिक चित्रपटानं थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून इतके प्रेम मिळत आहे की, निर्मातेही ते पाहून आश्चर्यचकित झाले आहेत. मनोरंजक गोष्ट म्हणजे, 2025 मध्ये अक्षय कुमारच्या स्काय फोर्सचे आतापर्यंत अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पण, 'छावा' सारखा कोणताही चित्रपट यशस्वी होऊ शकला नाही. विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आणि आठवड्याच्या शेवटीही या चित्रपटानं चांगली कमाई केली. आठवड्याच्या दिवसात चित्रपटांच्या कमाईत सामान्यतः घट होत असली तरी, सोमवारी 'छावा' चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घट झाली. परंतु मंगळवारी पुन्हा एकदा त्यात वाढ दिसून आली, ज्यामुळे व्यापार तज्ज्ञांनाही आश्चर्य वाटलं. सध्या हा चित्रपट प्रचंड नफा कमवत आहे.

विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग केली होती. त्यानंतर विकेंडला कमाईचा वेग वाढला आणि आता वीकडेमध्येही त्याचा प्रभाव कायम आहे. मंगळवारी (6 व्या दिवशी) चित्रपटाने तब्बल 32 कोटींची कमाई केली आहे.

पहिल्या सहा दिवसांची कमाई:

पहिला दिवस: 31 कोटी

दुसरा दिवस: 37 कोटी

तिसरा दिवस: 48.5 कोटी

चौथा दिवस: 24 कोटी

पाचवा दिवस: 25.25 कोटी

सहावा दिवस: 32 कोटी

एकूण कमाई: 197.75 कोटी

सहा दिवसांत जवळपास 200 कोटींच्या घरात पोहोचलेला ‘छावा’ आता 300 कोटींच्या दिशेने आगेकूच करत आहे.

'छावा' 200 कोटींपासून इंचभर दूर 

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट आता 200 कोटींपासून एक इंचभर दूर आहे. गुरुवारी हा चित्रपट हा आकडा ओलांडेल. 'छावा' ज्या वेगानं प्रगती करतोय, त्यामुळे तो लवकरच 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती