सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • केंद्रीय मंत्री अमित शहा आज पुणे दौर्यावर
 पूर्ण तपशील

छावा पाहून आशा ताई भारावली उभे रहा, नज़र उतराएची आहे तुमची ;छावा बघून भारावलेल्या आशाताईंनी काढली विकीची दृष्ट

डिजिटल पुणे    22-02-2025 12:42:35

मुंबई :  'छावा' चित्रपटाला देशभर मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानं अभिनेता विकी कौशल भारावून गेलाय. जिथं जाईल तिथं त्याचं जोरदार स्वागत होतंय आणि लोक त्याच्यावर भरभरुन प्रेम दाखवत आहेत. जेव्हा लोक अमाप प्रेम व्यक्त करतात तेव्हा त्या व्यक्तीला दृष्ट लागू नये याची काळजी घेण्याची एक पारंपरिक प्रथा आहे. एखादा विजय संपादन झाला किंवा मोहिम फत्ते झाली तर विजेत्याच्या स्वागतानंतर त्याची दृष्ट काढली जाते, त्याप्रमाणेच विकी कौशलचीही दृष्ट काढण्यात आली. त्याचा व्हिडिओ त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

एकीकडे छावा चित्रपटाची ही घोडदौड चालू असताना दुसरीकडे विकी कौशलने इन्स्टाग्राम खात्यावर अनोखा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये विकी कौशल घराच्या उंबऱ्याबाहेर उभं असलेला दिसतो. घरात येऊ पाहणाऱ्या विकीला आशा ताईंनी रोखलं आणि त्याला थांबवत म्हटलं की, “उभे रहा, नजर उतरायची आहे ”...हा व्हिडिओ विकी कौशलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यानं म्हटलंय की, "आशा ताईंनी मला लहानाचं मोठं होताना पाहिलंय...उंचीत आणि आयुष्यात दोन्हीही. तिनं काल छावा पाहिला आणि आग्रह धरला की तिथंच उभं राहा, मला तुझी नजर उतरायची आहे... प्रेम व्यक्त करण्याच्या आणि दुष्ट शक्तींपासून मला वाचवण्याचा हा तिचा नेहमीच मार्ग राहिला आहे. ती माझ्या आयुष्यात आहे याचा मला खूप आनंद आहे.", असं म्हणत विकीनं आशा ताईवरील आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

ज्या प्रकारे विकी कौशलनं आशा ताईंबद्दल लिहिलंय त्यानुसार त्या त्यांच्या घरी त्याच्या लहानपाणापासून काळजी घेत आल्या आहेत. माया दाखवण्याचा त्यांनी शोघलेला हा पारंपरिक मार्ग मराठमोठ्या संस्कृतीचा एक भाग आहे. 'छावा'च्या निमित्तानं विकी कौशल मराठी बोलताना दिसला. त्यानं साकारलेली मराठा साम्राज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची ऐतिहासिक भूमिका जगण्याचा प्रयत्न त्यानं यामधून केला आहे. इतकंच नाही तर यानिमित्तानं मराठी संस्कृती आत्मसात करण्याचा त्याचा निरंतर प्रयत्न सुरू आहे. त्यामुळंच, आशाताईंनी त्याची नजर उतरणं आणि त्याला विकीनं संमती देणं हा त्याच्यासाठी अभिमानाचा भाग बनला आहे.

दरम्यान, विकी कौशलच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक केले आहे. अवघ्या 20 तासांत साधारण 22 लाखांपेक्षा अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. सोबतच अनेक दिग्गज कलाकारांनीही या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता आयुष्मान खुरानाने सुंदर असं म्हटलंय. तर पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांनी तुम्ही खूप चांगलं काम केलं. विकी जी तुम्हाला 100 वर्षांचं समृद्ध आयुष्य लाभो, असं पौडवाल यांनी म्हटलंय. मराठमोळा कलाकार संतोष जुवेकर यानेदेखील या व्हिडीओवर कमेंट केली आहे. ह्याला म्हणतात प्रेम कमावणं...ह्याला म्हणतात.... इज्जत बढ गई और नजर उतर गई... आई जगदंबा खूप यश देवो राजं .. असं जुवेकरने म्हटलंय. 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती