सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • केंद्रीय मंत्री अमित शहा आज पुणे दौर्यावर
 पूर्ण तपशील

“काहीच नवीन नाही” - ‘छावा’ सिनेमावर अभिनेत्री अक्षता आपटे नाराज

अजिंक्य स्वामी    22-02-2025 16:16:13

मुंबई : सध्या बॉक्स ऑफिसवर विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला छावा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकत असताना, काहींनी मात्र त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

मराठी अभिनेत्री अक्षता आपटे यांनी या चित्रपटाबद्दल आपले मत स्पष्ट करताना सांगितले की, “सिनेमात जे आपल्याला आधीच माहिती आहे, तेच दाखवले आहे. स्क्रिप्ट अजिबात चांगली नाहीये आणि काहीच नवीनता नाही.” त्यांच्या मते, छावा हा चित्रपट प्रेक्षकांना नव्याने काहीच देत नाही, त्यामुळे तो निराशाजनक वाटला.

या चित्रपटात विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदाना यांनी महाराणी येसूबाईंची भूमिका निभावली आहे. तसेच, अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसतो.

अक्षता आपटे यांच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहीजण त्यांच्या मताशी सहमत असून चित्रपटाची कथा कमकुवत असल्याचे म्हणत आहेत, तर काही प्रेक्षक चित्रपटाचे समर्थन करत आहेत.छावा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असून, त्यावर सुरू असलेल्या चर्चांमुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळत आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती