सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

शेकडो वर्ष जुन्या व्यवसायाची पायाभरणी करणाऱ्या गोदरेज समूहाचे अखेर झाले दोन वाटे; वाटणीत कोणाच्या पदरात काय पडले ते पाहुयात..

डिजिटल पुणे    01-05-2024 11:52:30

मुंबई : देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक गोदरेज समूहाचा व्यवसाय आता दोन भागात विभागला गेला आहे. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी उद्योगधंद्यांचा उल्लेख होतो तेव्हा गोदरेज कुटुंबाचे नावही समाविष्ट केले जाते. शेकडो वर्षांपूर्वी पायाभरणी केलेल्या या कौटुंबिक व्यवसाय समूहाचे एकूण मूल्य २.३४ लाख कोटी रुपये असून समूहाच्या पाच कंपन्या बाजारात सूचिबद्ध आहेत. रिअल इस्टेटपासून ते ग्राहकोपयोगी उत्पादनांपर्यंत या कुटुंबाचा व्यवसाय पसरला आहे, परंतु आता १२७ वर्ष जुना कौटुंबिक व्यवसाय दोन भागात विभागला गेला आहे.

127 वर्ष जुन्या गोदरेज कुटुंबात आता वाटेहिस्से झाले आहेत. कंपन्यांची विभागणी झाली आहे. कुटुंबातील सदस्यांनी विभागणीवर स्वाक्षरी केली आहे. आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादिर यांना गोदरेज इंडस्ट्रीजचा अधिकार मिळाला आहे. त्यांतर्गत पाच कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध आहेत. आदि गोदरेज यांचे चुलत भाऊ-बहिण जमशेद आणि स्मिता यांना सूचीबद्ध नसलेल्या कंपन्या मिळाल्या आहेत. त्यांना गोदरेज अँड बॉयसची मालिकी मिळाली. यासोबतच त्यांना मुंबईतील मोठा भूखंड आणि संपत्तीत मोठा वाटा देण्यात येणार आहे. गोदरेज समूहाने कुलूप तयार करण्यापासून सुरु केलेला व्यवसाय आता साबण, घरगुती उपकरणं आणि रिअल इस्टेटपर्यंत विखुरलेला आहे.

कोणत्या हिस्सेदारांमध्ये कशी झाली वाटणी

गोदरेज कुटुंबात या विभाजनाबाबत करारावर स्वाक्षरी केल्यानंतर समूहाच्या व्यवसायाची विभागणी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. समुहाच्या पाच कंपन्या शेअर बाजारात सूचीबद्ध असून यामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज ऍग्रोव्हेट आणि अस्टेक लाईफ सायन्सेस यांचा समावेश आहे. या सूचिबद्ध कंपन्यांनी जबाबदारी ८२ वर्षीय आदि आणि ७३ वर्षीय नादिर गोदरेज यांच्यावर खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

वाटणी झाली असली तरी ब्रँड एकच

वाटणीची प्रक्रिया झाल्यानंतर गोदरेज कुटुंबियांनी याविषयीची प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, वाटणीची प्रक्रिया ही शेअरधारकांच्या मालकी हक्काचे पुनर्गठन असल्याचे गोदरेज कुटुंबाने स्पष्ट केले. दोन्ही गट गोदरेज ब्रँडचा उपयोग सुरु ठेवतील. वाटणी झाली असली तरी समान वारसा वाढविण्यासाठी आणि तो मजबूत करण्यासाठी दोन्ही गटांनी वचनबद्धता प्रतिपादित केली.

किती मोठा आहे समूह?

गोदरेज समूहाकडे सध्या ५ सूचीबद्ध कंपन्या आहेत. यामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कंझ्युमर प्रोडक्टस, गोदरेज ॲग्रोवॅट, गोदरेज प्रॉपर्टीज आणि लाईफ सायन्सेज यांचा समावेश आहे. सध्या या समूहाचे एकूण मूल्य २.३४ लाख कोटी रुपये आहे. कुटुंबातील पाच सदस्य, आदि गोदरेज, नादिर गोदरेज, जमशेद गोदरेज, स्मिता कृष्णा गोदरेज आणि रिशद गोदरेज यांच्याकडे G&B मध्ये प्रत्येकी १५.३% हिस्सेदारी आहे.

व्यवसायाची जबाबदारी अशी

सध्या गोदरेज कुटुंबात दोन गट आहेत. गोदरेज इंडस्ट्रीज अँड असोसिएट्स, त्याचे नेतृत्व आदि गोदरेज आणि त्यांचा भाऊ करतो. तर दुसरीकडे गोदरेज अँड बॉयसचे नेतृ्व जमशेद गोदरेज आणि त्यांची बहिण करते. आदि आणि नादिर गोदरेज हे गोदरेज अँड बायसमधील त्यांचा वाटा दुसऱ्या गटाला विक्री करतील. तर जमशेद गोदरेज आणि त्यांचे कुटुंब गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्समधील वाटा भावाच्या नावावर करतील.

देशाच्या उभारणीत योगदान

विभाजनानंतर नादिर गोदरेज यांनी म्हणाले की, गोदरेजची स्थापना १८९७ मध्ये भारतासाठी आर्थिक स्वातंत्र्य निर्माण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती. आम्ही व्यवसायावर लक्ष केंद्रित करून हा वारसा पुढे नेण्यास उत्सुक आहोत. तर चुलत भाऊ जमशेद गोदरेज सांगतात की गोदरेज अँड बॉयस नेहमीच राष्ट्र उभारणीच्या भक्कम उद्दिष्टाने प्रेरित असून आता या कौटुंबिक करारासह आम्ही व्यवसाय वाढीच्या दिशेने कार्य करू.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती