सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • पुण्यात पीएमपाएल ची सेवा रात्रभर सुरू राहणार
  • अजित पवारांना मोदी शाहाच्या दयेवर जगावे लागेल : वड्डेट्टीवार
  • भाजपाचे नितीन गडकरी,देवेंद्र फडवणीस ,चंद्रशेखर बावनकुळे ,दानवे यांचे कडे विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व
  • काहीना देव झाल्यासारखे वाटते : मोहन भागवत
 पूर्ण तपशील

ना धड संसार ना धड परमार्थ ! (भाग १)

डिजिटल पुणे    13-07-2024 18:43:49

ना धड संसार ना धड परमार्थ ! (भाग १)
 
ब्रह्मसुख नेले संसारे | संसार गेला ज्ञानाद्वारे | दोनी अपुरी पुरे | येकहि नाही ||७/६/१५||
 
संसाराच्या आसक्तीने ब्रह्मसुख मिळत नाही आणि कधी ब्रह्मज्ञानाच्या ओढीने संसारसुख नकोसे वाटते. अशा रीतीने धड संसार सापडत नाही, ना धड परमार्थ गवसत नाही. दोन्ही अर्धवट राहतात.
 
अशा मानसिक स्थितीचा अनुभव प्रत्येक पारमार्थिक व्यक्ती घेतो. संसाराचे दु:ख भोगत असताना वैराग्य येते. ईश्वराला शरण जाऊन दु:खमुक्त व्हावे असे वाटते. आणि परमार्थाची ओढ वाटू लागली तर संसार हातचा सुटतो की काय अशी भीती वाटू लागते. अशा दुविधेमध्ये नेमके कसे जगावे हे कळत नाही. अशावेळी नेमके काय करावे याचा उपाय श्रीसमर्थ बद्धमुक्तनिरुपण या समासात सांगत आहेत.
 
मागच्या समासातील कल्पनेचे वर्णन ऐकून शिष्य म्हणतो की ते वर्णन ऐकून क्षणभर ब्रह्माशी तदाकार होऊन गेलो. त्याच स्थितीत राहावे असे आता वाटत आहे. आता परत चंचल चित्त होऊन संसारात उतरावे नकोसे वाटते आहे. कल्पनातीत स्थितीत संसार दु:ख नसते. त्याचा थोडाही अनुभव घेतला तरी मनाला त्यातच राहावे वाटते. पण मनाचा खेळ अजब आहे. जो पर्यंत सद्गुरू श्रवण घडत आहे तोपर्यंत वैराग्य टिकते पण संसारात मन आले की संसाराशी एकरूप होऊन जाते. आणि परमार्थ सुटतो. मनाचे असे परमार्थात उंच आकाशात जाणे आणि परत जमिनीवर संसारात कोसळणे हे होत राहते. जसे एखाद्या किड्याच्या पायाला दोरा बांधावा आणि त्याला गरगर फिरवावे तशी काही माझी स्थिती होऊन बसली आहे अशी खंत शिष्य सद्गुरू समोर बोलून दाखवतो. तो म्हणतो की स्वामी ! आपले श्रवण करताना ब्रह्मस्वरूप मन झाल्यावर त्याच स्थितीत देह पडला तर किती चांगले होईल ! आणि देह पडणार नसेल तर हा आपपर भाव तरी नाहीसा व्हावा. अशी मनाची येरझार होत असताना ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलण्याची लाज वाटते ! 
 
एक तर ब्रह्मस्वरूप तरी व्हावे नाहीतर संसारात तरी राहावे ! ही येरझार नकोशी झाली आहे ! क्षणभरासाठी ब्रह्मस्वरूप होणारे मन परत संसारात येते; हा काही पक्केपणा नाही. यामुळे संसार किंवा परमार्थ दोन्ही अर्धवट राहतात. या गोंधळात मी सापडलो आहे, मी नेमके काय करावे ? मला सांगा.
 
सद्गुरू समर्थ यावर बोलतात अरे ! ब्रह्माशी तदाकार झाल्यावर ज्यांनी देह सोडला असे मुक्त झाले. बाकी व्यासादिक (सप्त चिरंजीवापैकी एक) जे ज्ञानी झाले ते मुक्त झाले नाहीत असे का आहे ? यावर शिष्य म्हणतो की स्वामी ! आरंभापासून शेवटपर्यंत शुक वा वामदेव हेच मुक्त झाले असे वेद म्हणतात. मग बाकीचे मुक्त झाले असे कसे म्हणता येईल ? यावर समर्थ म्हणतात की, अरे ! हे दोघेच मुक्त आहेत असे म्हणावे तर मोठमोठे ब्रह्मज्ञानी पुरुषांना मुक्तांच्या वर्गात जागाच मिळणार नाही. हे दोघेच मुक्त झाले असे म्हणणे पढतमूर्खपणा आहे. या जगात असंख्य ऋषी, मुनी, योगी मुक्त झालेले आहेत.
 
क्रमश: ...
 
संशोधक, लेखक, कथाव्यास - श्री. दामोदर प्र. रामदासी, पुणे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती