सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 पूर्ण तपशील

नामवंत महाविद्यालयात शिक्षकांनी केला १७ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; गुन्हा दाखल होताच शिक्षक फरार

डिजिटल पुणे    31-08-2024 10:28:28

चंद्रपूर : बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना चंद्रपूरच्या वरोरा येथील एका नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. यात दोन शिक्षकांकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडलीय. १७ वर्षीय विद्यार्थिनी बीए प्रथम वर्षात शिक्षण घेत असून वाढदिवसाचं निमित्त करून या विद्यार्थिनीला शिक्षकांनी आपल्या रूमवर बोलावून अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी पोक्सो (POCSO) आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केलांय. मात्र गुन्हा दाखल होताच संशयित दोन्ही आरोपी शिक्षक फरार झाले आहे.

पीडित मुलीने या प्रकरणाची माहिती पालकांना दिल्यावर वरोरा पोलिसांनी पोक्सो (POCSO) आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल होताच संशयित दोन्ही आरोपी शिक्षक फरार झाले आहे. मात्र, या घटनेची माहिती मिळताच वरोरा शहरातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष आक्रमक झाले असून, या घटनेविरोधात आंदोलन करून आरोपी शिक्षकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती