सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
  • समाजसेवा करण्याचा सल्ला केजरीवाल यांनी मानला नाही : आण्णा हजारे
 जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ‌(अजित दादा पवार गट) उरण तालुका युवा अध्यक्ष समत रउफ भोंगले यांच्या अथक प्रयत्नांना यश.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    07-09-2024 10:30:28

उरण : उरण तालुक्यातील ओएनजीसी कंपनी समोर असलेल्या द्रोणागिरी कॉलनी सर्वे नंबर १३/२, म्हातवली मधील नऊ रहिवाशी मागील सात वर्षापासून एमआयडीसी च्या पाण्यापासून वंचित होते. त्यांच्या पाण्याचा प्रस्ताव मागील सात वर्षापासून उरण-अंबरनाथ-अंधेरी असा फिरत होता. म्हातवली मधील रहिवाशी  कृष्ण कुमार घरत हे  समत रउफ भोंगले यांना भेटून त्यांनी त्यांची पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय सांगितली.  समत रउफ भोंगले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे  यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय सांगितली.आणि लगेचच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी प्रश्न निकाली काढण्याचे आदेश दिले.एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नाने द्रोणागिरी कॉलनी उरण मधील नऊ रहिवाशी जे एमआयडीसीच्या पाण्यापासून मागील सात वर्षे पासून वंचित होते त्यांची समस्या दिनांक ६/९/२०२४ रोजी पूर्ण झाली आहे.

समत भोंगले यांच्या पाठपुराव्याला यश आले असून नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय कायमची दूर झाल्याने द्रोणागिरी कॉलनी, म्हातवली ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी प्रश्न सोडविल्याबद्दल या कामासाठी मेहनत घेणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उरण तालुका युवा अध्यक्ष समत रउफ भोंगले, सामाजिक कार्यकर्ते कृष्ण कुमार घरत, गिरीश महामुणकर, सामाजिक कार्यकर्ते  संदेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते प्रीतम ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते रियाज काद्री व एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती