सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 जिल्हा

जुन्या साकवच्या जागी नवे रुंद पूल बांधण्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर,जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर यांची प्रशासनाकडे मागणी

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    18-09-2024 16:05:04

उरण : उरण तालुक्यातील धुतुम गावाजवळ असलेले धुतुम बैलोंडा खाडीवर (नांदोरा )बांधलेला जुना साकव(पायवाट )तसेच दिघोडे उघडीवरील साकव नादुरुस्त होऊन मोडकळीस आलेले असून सिडकोच्या माध्यमातून जुन्या साकवच्या जागी नवीन पूल बांधण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर,माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी रायगड, जिल्हा परिषद रायगड, पंचायत समिती उरण,सिडको प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून  केली होती.या संदर्भात माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर व जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर यांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली. व ही समस्या सोडविण्यासाठी त्यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा महिला अध्यक्षा तथा माजी महिला व बालकल्याण सभापती उमाताई मुंढे,  उरण तालुका अध्यक्षा-कुंदा ठाकूर ,अलिबाग महिला तालुका अध्यक्षा,खालापूर तालुका अध्यक्षा,पूजा विशाल पाटील,जागृती मारुती पाटील,  उपस्थित होते.
 
 धुतुम येथील सदर पूल जूने झाले आहे शिवाय रहदारीच्या दृष्टीने हे साकव निकृष्ट दर्जाचे झाले आहे. येथे अजूनही पायवाट असल्यामुळे नागरिकांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे.दिघोडे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने धुतुम गावातील लोकांना दोघोडे येथे जाण्यासाठी सुलभ रस्ता तयार होईल. किंवा दिघोडे येथील नागरिकांना धुतुम येथे सुलभपणे जाता येईल. शिवाय धुतुम गावात आयओटीएल ही ज्वलनशील पदार्थची कंपनी कार्यरत आहे. येथे भविष्यात एखादी आग लागली तर फायर ब्रिगेडच्या वाहनांना किंवा ऍम्ब्युलन्स आदी वाहनांना येण्या जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. त्यामुळे भविष्यात खूप मोठा धोका निर्माण झाल्यास  सुसज्ज असे नवीन पूल, नवीन रस्ते असणे गरजेचे आहेत.हा पूल तयार झाल्यास दिघोडे येथील मच्छिमार करणाऱ्या कोळी बांधवांना तसेच जहाज बांधणीचे काम करणाऱ्या कामगारांना याचा खूप मोठया प्रमाणात फायदा होणार आहे.काही महिन्या पूर्वी पुलावर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे अशी दुर्घटना परत होऊ नये, भविष्यात कोणतेही दुर्घटना होऊ नये तसेच जनतेचे हित लक्षात घेउन नागरिकांचा प्रवास सोप्पा व्हावा,  सकाळी नागरिकांना चालण्यासाठी रस्ता उपलब्ध व्हावा यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर यांनी जूना साकव (पूल) पाडून त्या जागी नविन पूल बांधावे व हे काम जिल्हा परिषद कडे वर्ग करावे अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
 
 धुतुम बैलोंडा खाडीवर तसेच दिघोडे उघडी येथे त्वरित नवीन पूल बांधण्यात यावे. हा पूल अरुंद असावा सदर काम जिल्हा परिषदेकडे वर्ग करावा यासाठी विद्यमान जिल्हा परिषद सदस्य कुंदा वैजनाथ ठाकूर,माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर हे प्रयत्नशील आहेत. यासाठी त्यांनी खासदार तथा मंत्री सुनील तटकरे यांची देखील भेट घेतली आहे. लवकरच सदर समस्या मार्गी लावण्याचे तसेच या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हा परिषद सदस्य कुंदा ठाकूर व वैजनाथ ठाकूर यांना दिले आहे.या संदर्भात सिडको व इतर प्रशासना सोबत लवकरच मिटिंगचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे ही समस्या मार्गी लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.धुतुम बैलोंडा  तसेच दिघोडे उघडी येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन पूल त्वरित उभारण्यात यावे अशी मागणी आता जनतेतूनही पुढे येत आहे.सदर प्रश्न मार्गी लागल्यास कोणत्याही वाहनाला कुठेही लगेच प्रवास करणे सहज सोप्पे होणार आहे. यामुळे प्रवाशी वर्ग, वाहन चालकांचा वेळ व श्रमाची मोठया प्रमाणात बचत होणार आहे.
 
धुतुम -बैलोंडा खाडीवर (नांदोरा) व दिघोड़े बेलोरा काप्रीदेव खाडीवरील साकव नादुरुस्त असल्यामुळे सदर जागेवर नवीन दोन पुलाचे बांधकाम करण्याबाबत प्रशासनाला पत्रव्यवहारद्वारे विनंती केली होती.सदर पुलांच्या बांधकामाचे हस्तांतर जिल्हा परिषदे कडे करण्यात यावा व सदर कामासाठी लागणारा निधी जिल्हापरिषदेकडे वर्ग करण्यात यावा जेनणेकरून सदर पुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण करता येईल.अशी मागणी मी सिडको प्रशासन तसेच खासदार सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. सदर प्रश्न मार्गी लागल्यास त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना मोठया प्रमाणात होणार आहे. रिंग रूट झाल्यास सर्वांना प्रवास सुलभ होणार आहे.
  - वैजनाथ ठाकूर, माजी जिल्हा परिषद सदस्य


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती