सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 जिल्हा

जिल्हा परिषद शाळा, रानसई आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप.

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी)    19-09-2024 14:34:44

उरण : उरण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते हरेश्वर ठाकूर (रायगड भूषण - विशेष सन्मान पत्र २०२४ प्राप्त)यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.उरण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, रानसई आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप,खाऊ वाटप तसेच शाळेसाठी उपयुक्त असे असणारे लेक्चर स्टँड शाळेला भेट देण्यात आला.यावेळी नूतन सुजित गोंधळी,  सुजित एकनाथ गोंधळी (रायगड पोलीस) तसेच कु. वैष्णवी आणि कू. रिद्धी तांडेल उपस्थित होते.सदर सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल हरेश्वर ठाकूर यांनी कडू मॅडम आणि म्हात्रे मॅडम यांचे आभार मानले.शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती