सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • आपल्या आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री
  • चंद्रकांत दादा यांच्या ताफ्यातील गाडीला मद्यधुंद कार चालकाने दिली धडक.,चंद्रकांत दादा सुखरूप
  • आज सकाळी दगडूशेठ गणपतीची अजित पवार यांचे हस्ते पूजा
  • अमृता फडवणीस यांनी भाऊ रंगारी गणपतीची आरती
 जिल्हा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्या ऑनलाईन उद्घाटन

डिजिटल पुणे    19-09-2024 18:39:44

नाशिक :  व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या संकल्पनेचा फायदा अधिकाधिक युवक-युवतींना होण्यासाठी जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील एकूण 63 महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील या 63 महाविद्यालयांध्ये शुक्रवार दि. 20 सप्टेंबर 2024 रोजी  दुपारी 12.30 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमास ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

या कार्यक्रमास  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता  व नाविन्यता  मंत्री, लोकसभा व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य ई – उपस्थित तर स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यात बागलाण (सटाणा) -2,  चांदवड-4,  देवळा-1,  दिंडोरी-4, इगतपुरी-2, कळवण-2, मालेगाव-12, नांदगाव-2,  नाशिक-19, निफाड-3, सिन्नर-5, त्र्यंबकेश्वार-6 व येवला-1 अशी एकूण 63 आचार्य कौशल्य विकास केंद्रे तालुकानिहाय महाविद्यालयांमध्ये  सुरू होत आहेत.

या केंद्रांमध्ये 200 ते 600 तासांचे (साधारण: 3 महिने) National Skills Qualification Framework (NSQF) सुसंगत असलेले अल्प मदतीचे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. स्थानिक उद्योगांची गरज लक्षात घेवून उद्योग आस्थापनांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होवून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी युवक- युवतींना उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक च्या कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अधिकारी अख्तर तडवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती