सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 पूर्ण तपशील

पुणे हादरलं.....! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे बोपदेव घाट परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार; घटनेमुळे सर्वत्र खळबळ

डिजिटल पुणे    04-10-2024 12:36:51

पुणे: वानवडी भागात सहा वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच आता कोंढव्यातील बोपदेव घाट परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री बोपदेव घाट परिसरात 21 वर्षीय तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती. त्या ठिकाणी रात्री अकराच्या सुमारास तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनतर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची पथके आरोपींच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्याचार, विनयभंगाच्या घटना कमी होत नसल्याने महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे.

रंजन कुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त पुणे यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे ती पुढीलप्रमाणे काल रात्री २१ वर्षीय मुलगी आपल्या मित्रांसोबत बोपदेव घाटात गेली होती. त्या ठिकाणी बसून पीडित तरुणी आणि तिच्यासोबत असलेले मित्र गप्पा मारत बसले होते. रात्री अकरा वाजण्यास सुमारास त्या ठिकाणी ३ अनोळखी लोकं त्या ठिकाणी आले. त्यांनी पीडितेसोबत असलेल्या मुलाला मारहाण केली. तरुणीवर अतिप्रसंग केला. या घटनेनंतर मुलाने त्याच्या नातेवाईकांना या घटनेबाबत माहिती दिलेली आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना शुक्रवारी पहाटे ५ मिळाली. यासाठी एकूण १० पथके रवाना करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या घटनेतील ३ मुलांचा शोध सुरु आहे. बोपदेव घाटात नेहमीप्रमाणे लोक मार्निंग वॉकला जात असताना मारहाण करत मित्राला बाधून ठेवले. होते. या घटनेतील पीडित तरुणी गंभीर जखमी आहे, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पर्णपणे निष्पत्र झालेले नाहीत.

सुप्रिया सुळेंची संतापजनक पोस्ट

या घटनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संतापजनक पोस्ट लिहली आहे.  सोशल मिडिया एक्सवरती सुळेंनी पोस्ट लिहून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल उपस्थित केले आहेत. पोस्टमध्ये, "अतिशय संतापजनक! पुण्यात हे काय सुरू आहे? बोपदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत.या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहखाते काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहीलेला नाही, असे म्हणावे लागत आहे. शासनाने सदर घटनेतील आरोपींना गजाआड करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी", अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे


 लोकांच्या प्रतिक्रिया

Digital Pune
हरकचंद जैन
 04-10-2024 13:58:45

चूक कोणाची मित्रा बरोबर रात्री 11 वाजता जायचे कशाला आई बाप परवानगी ते पण मित्रा सोबत जायला कशी देतात मग शासनाचे नावा ने बोंब मारायची आ बैल मुझे मार सारखं प्रकार

 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती