सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 पूर्ण तपशील

बोपदेव घाटातील बलात्काऱ्यांचा दिसताक्षणी एन्काऊंटर, पोलिसांकडून जोरदार तयारी; कारवाईबाबत गुप्तता

डिजिटल पुणे    09-10-2024 13:53:55

पुणे : पुण्यातील बोपदेव घाट येथे गेल्या गुरुवारी रात्री ११ वाजता मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेतील आरोपी अद्यापही फरारच आहेत. अद्याप त्यांचा थांगपत्ता लागलेला नाही. तसेच, त्यांची माहिती देणाऱ्यांना १० लाख रुपयांचं बक्षिणही ठेवण्यात आलं आहे. तर, आता पुणे पोलिसांनी तिन्ही गुन्हेगारांना निर्वाणीचा इशारा दिल्याची माहिती आहे. सरेंडर व्हा, अन्यथा एन्काउंटर करु, असा इशारा पोलिसांनी दिल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे आरोपी सरेंडर होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

पोलिसांना सापडेना धागेदोरे

बोपदेव घाटात तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचाराच्या घटनेला सहा दिवस उलटूनही पोलिसांना आरोपींबाबत अद्याप धागेदोरे सापडलेले नाहीत. आरोपींचा शोध घेण्यासाठी बोपदेव घाटात यापूर्वी लूटमार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या रेकॉर्डवरील आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात गुरुवारी (ता. ३) रात्री महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. गुन्हे शाखेसह पोलिसांच्या २५ पथकांकडून या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे.

आरोपींचे दिसताच क्षणी करणार एन्काऊंटर

मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांची ओळख पटल्यानंतर दिसताक्षणी एन्काऊंटर करण्याच्या तयारीत पुणे पोलीस असल्याची माहिती अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर असून, सीसीटीव्ही आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) माध्यमातून संबंधित आरोपींची कुंडली मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, एन्काऊंटर करण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक सराव करीत असून, त्याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती