सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 जिल्हा

या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती या विकासयात्रेचा सारथी बनेल ;केलेल्या कामाची पोचपावती म्हणून जनतेचा कौल मिळेल, पुन्हा कमळ फुलेल - चंद्रकांत पाटील

डिजिटल पुणे    17-10-2024 10:19:42

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची मंगळवारी पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे  विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे. ही वैचारिक लढाई लढण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे मत उच्च  तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीची तारीख जाहीर करताच म्हटले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने केलेल्या चौफेर विकासकामांमुळे जनतेच्या मनात प्रचंड आशावाद निर्माण झाला आहे. केलेल्या या कामाची पोचपावती म्हणून जनतेचा कौल मिळेल, पुन्हा कमळ फुलेल. विकासकामांच्या जोरावरच, या निवडणुकीत आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात उज्वल यशाची ग्वाही देत आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती या विकासयात्रेचा सारथी बनेल, असा विश्वास वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले. 

महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत येत्या 26 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात नवी विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे, त्यानुसार महाराष्ट्रात दिवाळीनंतर म्हणजे 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला मजमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राज्याच्या 288 विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती