सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 जिल्हा

लाडक्या बहिणीं'ना मिळणार दिवाळी बोनस, थेट खात्यात जमा होणार 5500 रुपये, वाचा कोण आहे पात्र

डिजिटल पुणे    17-10-2024 15:35:30

मुंबई : मुख्यमंत्री 'माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिवाळीच्या निमित्ताने 5500 रुपयांचा बोनस देण्याची चर्चा सुरू आहे. याअंतर्गत, पूर्वी दिला जाणारा 3000 रुपयांचा बोनस ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वितरित केला जाईल. त्यानंतर काही निवडक महिला आणि मुलींच्या बँक खात्यात आणखी 2500 रुपये जमा केले जातील. सध्या या चर्चेबाबत अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही, तरीही सोशल मीडियावर याबाबत उत्सुकता आहे.

खरं तर सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले होते. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा निधीच आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले होते. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले होते. 

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडून काही निवडक महिलांना अतिरिक्त 2500 रुपये दिले जाणार आहेत.त्यामुळे चौथ्या हप्त्याचे 3000 रूपये आणि 2500 मिळून महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार आहेत. दिवाळी बोनस स्वरूपात हे पैसे महिलांना मिळणार आहे. पण यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. या अटीत बसणाऱ्या महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार आहे. 

 

'या' महिलांच्या खात्यात पैसे येणार?

1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.

2) त्यांनी योजनेच्या माध्यमातून कमीत कमी तीन महिन्यांचा लाभ घेतला पाहिजे. 

3) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.

4) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात 5500 जमा होणार असल्याची चर्चा आहे. आता जर तुम्ही या अटीत बसत असाल तर तुमच्या खात्यात देखील पैसे जमा होणार आहेत. 

 

 

 


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती