सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • संजय खन्ना देशाचे नवे सरन्यायाधीश होणार
  • भाजपाची पहिली यादी उद्या जाहीर होणार
 जिल्हा

ठाणे शहरात ११ वर्षांच्या मुलीचा विनयभंग प्रकरणाच्या निषेधार्थ ठाणेकर रस्त्यावर, भंडारआळी ते मासुंदा तलाव मोर्चा

डिजिटल पुणे    18-10-2024 13:56:47

ठाणे : ठाणे शहरात ११ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जामीन मिळाल्याने संतप्त ठाणेकरांनी गुरुवारी शहरात मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. बदलापूरला एक न्याय, ठाण्याला एक न्याय..चालणार नाही, बालकांवरील अन्याय सहन करणार नाही, आरोपीला कडक शासन झाले पाहिजे, या मागणीसाठी पक्षाचे नेते श्री. अविनाश जाधव यांनी सर्वपक्षीय मोर्चा काढला. ज्यात ठाण्यातील जनता उस्फुर्तपणे सहभागी झाली.

काय आहे नेमकं प्रकरण?

एका इमारतीमध्ये पीडित अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली एका ५५ वर्षाच्या व्यक्तीविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. या प्रकारानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

नागरिकांचा रस्तावर उतरुन मोर्चा

आरोपीला जामीन झाल्याने सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मोर्चाची हाक दिली होती. यामध्ये सर्वसामान्य ठाणेकरांसह मनसेचे स्थानिक नेते सहभागी झाले.संतप्त बदलापूरला एक न्याय, ठाण्याला एक न्याय. चालणार नाही, बालकांवरील अन्याय सहन करणार नाही, आरोपीला कडक शासन झाले पाहिजे,अशा आशयाचे फलक घेऊन संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतल्याची माहिती ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती