मुंबई : मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे चर्नी रोड येथील मित्तल आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या आठव्या मजल्यावरील जागेत स्थलांतर झाले आहे. त्यामुळे या कार्यालयाशी पत्रव्यवहार करताना ‘विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई, मित्तल फाउंडेशन ट्रस्ट आयुर्वेदिक हॉस्पिटल इमारत, आठवा मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड रेल्वे स्टेशन जवळ, कैवल्यधाम योगा केंद्राच्या पाठीमागे, मरीन ड्राईव्ह, मुंबई – 400002’ या पत्त्यावर पत्रव्यवहार करण्यात यावा, असे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
सर्व अधिनस्त कार्यालये, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) (माध्यमिक) जिल्हा परिषद / मनपा, प्राचार्य, कनिष्ठ महाविद्यालये, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी केले आहे.