मुंबई : राज्यात येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये 18 ते 19 वयोगटातील एकूण 22 लाख 22 हजार 704 तर वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेले 47 हजार 392 मतदार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
राज्यातील एकूण मतदारांमध्ये 5 कोटी 22 हजार 739 पुरुष, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला तर 6 हजार 101 तृतीयपंथी मतदार असे एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यामध्ये 18 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 22 लाख 22 हजार 704 मतदारांमध्ये पुरुष मतदार 12 लाख 91 हजार 847, 9 लाख 30 हजार 704 महिला तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 153 इतकी आहे. 20 ते 29 या वयोगटातील एकूण 1 कोटी 88 लाख 45 हजार 005 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 1 लाख 62 हजार 412, महिला मतदार 86 लाख 80 हजार 199 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2394 इतकी आहे. 30 ते 39 या वयोगटातील एकूण 2 कोटी 18 लाख 15 हजार 278 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 11 लाख 21 हजार 577, महिला मतदार 1 कोटी 6 लाख 91 हजार 582 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2 हजार 119 इतकी आहे.
40 ते 49 या वयोगटातील एकूण 2 कोटी 7 लाख 30 हजार 598 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 कोटी 7 लाख 49 हजार 932, महिला मतदार 99 लाख 79 हजार 776 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 890 इतकी आहे. 50 ते 59 या वयोगटातील एकूण 1 कोटी 56 लाख 10 हजार 794 मतदारांमध्ये पुरुष मतदार 78 लाख 54 हजार 052, महिला मतदार 77 लाख 56 हजार 408 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 334 इतकी आहे. 60 ते 69 या वयोगटातील एकूण 99 लाख 18 हजार 520 मतदारांमध्ये पुरुष मतदार 50 लाख 72 हजार 362, महिला मतदार 48 लाख 46 हजार 25 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 133 इतकी आहे.
वर्ष 70 ते 79 या वयोगटातील एकूण 53 लाख 52 हजार 832 मतदारांमध्ये पुरुष मतदार 26 लाख 36 हजार 345, महिला मतदार 27 लाख 16 हजार 424 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 63 इतकी आहे. 80 ते 89 या वयोगटातील एकूण 20 लाख 33 हजार 958 मतदारांमध्ये पुरुष मतदार 9 लाख 15 हजार 798, महिला मतदार 11 लाख 18 हजार 147 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 13 इतकी आहे. 90 ते 99 या वयोगटातील एकूण 4 लाख 48 हजार 38 मतदारांमध्ये पुरुष मतदार 1 लाख 97 हजार 323 तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 50 हजार 715 इतकी आहे.
वयाची शंभर वर्षे पूर्ण झालेल्या 100 ते 109 या वयोगटातील एकूण 47 हजार 169 मतदारांमध्ये पुरुष मतदार 20 हजार 983, महिला मतदार 26 हजार 184 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 2 आहे. 110 ते 119 या वयोगटातील एकूण 113 मतदारांमध्ये पुरुष मतदार 52 तर महिला मतदारांची संख्या 61 आहे. तर 120 हून अधिक वयोगटातील 110 मतदारांमध्ये पुरुष मतदार 56 तर महिला मतदारांची संख्या 54 आहे.
विशेष वयोगटामध्ये 85 ते 150 वयोगटामधील एकूण 12 लाख 40 हजार 919 मतदारांमध्ये 5 लाख 42 हजार 891 पुरुष, 6 लाख 98 हजार 022 महिला आणि 6 तृतीयपंथी मतदार आहेत. तर 100 ते 150 वयोगटामधील एकूण 47 हजार 392 मतदारांमध्ये 21 हजार 91 पुरुष, 26 हजार 299 महिला आणि 2 तृतीयपंथी मतदार आहेत. त्याचबरोबर एकूण 6 लाख 41 हजार 425 दिव्यांग मतदारांमध्ये पुरुष मतदार 3 लाख 84 हजार 69, महिला मतदार 2 लाख 57 हजार 317 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 39 इतकी आहे. सेवा दलातील (सर्व्हिस व्होटर्स) एकूण 1 लाख 16 हजार 170 मतदारांमध्ये 1 लाख 12 हजार 318 पुरुष तर 3 हजार 852 महिला मतदार आहेत.
राज्यात मतदानासाठी एकूण 1 लाख 186 मतदान केंद्र उभारण्यात येत असून यापैकी शहरी भागात 42 हजार 604 तर ग्रामीण भागात 57 हजार 582 केंद्र असणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.