सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 राज्य

चंदिगड महापौर मतदान गुन्ह्यावेळीही तावडे सक्रिय होते.*: मुकुंद किर्दत, आप राज्य प्रवक्ते

MSK    19-11-2024 19:51:49

*चंदिगड महापौर मतदान गुन्ह्यावेळीही तावडे सक्रिय होते.*: मुकुंद किर्दत, आप राज्य प्रवक्ते

 

      आज विरार येथे भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अडकल्यावर त्यांच्याकडे पाच कोटीची कॅश होती असा आरोप केला आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने त्यांच्या खोलीमधून दहा लाख रुपये जप्त केल्याची बातमी सुद्धा आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आणि प्रवीण दरेकर या दोघांनीही पण हा आरोप हास्यस्पद असून विनोद तावडे राष्ट्रीय सचिव असताना ते एखाद्या मतदारसंघांमध्ये पैसे वाटायला कशाला येतील? त्यामुळे असा आरोप चुकीचा आहे असा दावा केला आहे यातून काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण होतात 

१) भाजप नेत्यांच्या दाव्याप्रमाणे राष्ट्रीय नेता एका छोट्या मतदारसंघांमध्ये पैसे वाटायला येत नाही असा सुधीर मुनगंटीवार व प्रवीण दरेकर यांच्या म्हणण्याचा अर्थ असल्यामुळे राष्ट्रीय नेता कुठल्या स्तरावर पैसे वाटप करतो याचे स्पष्टीकरण भाजपने द्यावे आणि मतदारसंघ पातळीवरती कोण पैसे वाटप करतो हे स्पष्ट करावे. पन्ना प्रमूख हे काम करतो का?        

                                                 
२) विनोद तावडे यांच्या रूममधून निवडणूक आयोगाने दहा लाख रुपये कॅश जप्त केली आहे. मोदी सर्व व्यवहार इलेक्ट्रॉनिक कार्डने करावेत असे म्हणत असताना विनोद तावडे  दहा लाखाची कॅश घेऊन का फिरतात याचे उत्तर द्यावे? 

 

३) निवडणुकीच्या आदल्या दिवशी पैसे वाटप भाजपकडून होणार असल्यामुळेच याआधी मोठ्या नेत्यांच्या बॅगा तपासण्याचे नाटक निवडणूक आयोगाने केले का?

 

४) विनोद तावडे यांनी यापूर्वी चंदीगड मध्ये सुद्धा महानगरपालिका महापौर पद निवडणुकीत सक्रिय होते. आम आदमी पार्टी कडून पद ताब्यात घेण्यासाठी तेथील स्थानिक नगरसेवक फोडले होते. परंतू नंतर सुप्रीम कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप केला. पंजाब मधील लोकसभा निवडणुकी दरम्यान आप चे खासदार यांचा प्रवेश सुद्धा विनोद तावडे यांनीच करून घेतला होता. त्यामुळे हे पैसे मतदारांना वाटण्यासाठी नसतील कदाचित परंतु कोणाला खोके देवून मतदानापूर्वी खरेदी करण्यासाठी आणले होते का?

या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे भाजपने देण्याची गरज आहे. जनता त्यांच्या मतदानाच्या मार्गाने याला उत्तर देईलच परंतु निवडणूक आयोगाने सुद्धा याची गंभीर दखल घेत पोलीस केस दाखल केल्या पाहिजेत. 

-


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती