सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
  • वारी काळात एसटी ला १ कोटीचा फायदा
  • शरद पवार घेणार अकरा दिवसात 42 सभा
  • गद्दारी करणाऱ्यांना आधी लाज वाटायची आता नाही : राज ठाकरे
 पूर्ण तपशील

60 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलींवर केला लैंगिक अत्याचार ! शेजारी राहणाऱ्यानेच केला विश्वासघात, चार महिने करत होता अत्याचार

डिजिटल पुणे    28-11-2024 11:54:11

पुणे : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या स्मार्ट पुणे शहरात साततत्याने अपघात, अत्याचार, खून, चोरी अशा घटना घडल्याचे समोर येत आहे. अशातच आता पुण्यातन विकृतीचा कळस असणारी बातमी समोर आली आहे. एका ६० वर्षीय नराधमाने शेजारी राहणाऱ्या चिमुकलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. चॉकलेटच्या बहाण्याने नराधमाने दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार  केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या एका ६० वर्षाच्या नराधमाने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी ६० वर्षाच्या नराधमाला अटक केली आहे. याबाबत मुलींच्या गार्डने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दोघीही मुली घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या नराधमाने त्यांना चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी नेऊन वेळोवेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली असून मुंढवा पोलीस तपास करीत आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती