कानपूर : ३० वर्षांच्या एका नर्सवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर पीडितेने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. पीडितेने पोलिसांना तिच्या वेदना सांगितल्यानंतर पोलीसही हादरुन गेले आहेत. या घटनेतील पीडिता नर्स ही स्कूटरवरुन रुग्णालयात ये-जा करत होती. दरम्यान या घटनेचा जो प्राथमिक वैदकीय चाचणी अहवाल आला आहे त्यात नर्सवर बलात्कार झाल्याबाबत सकृतदर्शनी काही पुरावा मिळाला नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान पीडित नर्सने तिच्या वेदना सांगितल्या आहेत.
उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये 30 वर्षीय नर्सवर दोन व्यक्तींनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, गोविंद आणि राम मीलन यांनी तिला जंगलात नेऊन मारहाण केली, तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी आणि मिरची पावडर टाकली. या घटनेमागे शेजारी राहणाऱ्या जयंतीदेवीचा हात असल्याचा आरोपही आहे. घटनास्थळी धावलेल्या शेतकऱ्यांमुळे आरोपी पळून गेले. सध्या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे, मात्र वैद्यकीय तपासणी अहवालात बलात्काराचे पुरावे अद्याप सापडलेले नाहीत.
पीडितेने सांगितलं जयंतीदेवी तिच्या घराच्या शेजारी राहते. बलात्काराच्या घटनेच्या एक दिवस आधी या दोघींमध्ये वाद झाला होता. जयंतीदेवी या महिलेला असं वाटलं होतं की तिच्या नवऱ्याचं आणि पीडितेचं अफेअर सुरु आहे. उत्तर प्रदेशातल्या कानपूरमधली ही घटना आहे.पीडितेने पोलिसांना सांगितल्यानुसार ती चुरखी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या एका रुग्णालयात काम करते. गुरुवारी ती तिच्या स्कूटरवरुन रुग्णालयात जात होती तेव्हा गोविंद आणि राम मीलन यांनी तिची वाट अडवली तिला जंगलात घेऊन गेले, शिवीगाळ, मारहाण केली आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही सगळी हकीकत पीडितेने तिच्या नवऱ्यालाही सांगितली. तिच्या नवऱ्याने हे पण सांगितलं की चार जणांनी पकडून तिला जंगलात नेलं होतं. दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये काठी आणि मिरची पावडर टाकली. या सगळ्या घटनेनंतर पोलिसांनी तिला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवलं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातल्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची चौकशी करण्यात येते आहे. आत्तापर्यंत सामूहिक बलात्कार झाल्याचा पुरावा किंवा प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पावडर टाकल्याचा पुरावा मिळालेला नाही. ज्यावेळी पूर्ण वैद्यकीय अहवाल मिळेल त्यावेळी त्यात काय नमूद आहे त्यावरुन आम्ही गुन्हा दाखल करु असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान नर्स आणि तिच्या पतीने नर्सवर सामूहिक बलात्कार झाल्याचं म्हटलं आहे.