सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कामकाजाचा घेतला आढावा

डिजिटल पुणे    27-12-2024 18:08:16

लातूर : राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी  लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन संचालक मंडळाकडून चालू असलेल्या कामाचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. 

प्रारंभी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व मान्यवरांनी  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग व लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच संचालक मंडळाने दोन मिनिटे स्तब्ध राहून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.  

यानंतर लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या चालू असलेल्या कामासह शेतमालाची दैनदीन आवक, मिळत असलेला भाव व दैनदीन कामाची माहीती घेतली, येथील कामाच्या संदर्भात संबंधितांना आवश्यक सूचना केल्या. 

यावेळी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडिले, प्रभारी सचिव अरविंद पाटील, संचालक सर्वश्री अनिल पाटील, श्रीनिवास शेळके, शिवाजी कांबळे, सुभाष घोडके, अनंत पवार, सचिन सूर्यवंशी, बालाजी वाघमारे, बालाप्रसाद बीदादा, सुधीर गोजमगुंडे, युवराज जाधव, लक्ष्मण पाटील, बळवंत पाटील, आनंद पाटील, तुकाराम गोडसे, शिवाजी देशमुख, आनंद मालू, अभय शहा आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती