सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

संतोष देशमुख हत्याप्रकरणात सरकारचा मोठा निर्णय; विशेष तपास पथकाची केली नेमणूक

डिजिटल पुणे    02-01-2025 14:52:51

मुंबई : आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण केल्यानंतर कराडला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपींचाही शोध घेतला जात आहे. आता, राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेतलेला आहे. देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडवीस यांनी घेतल्याने तपासाचा वेग अधिक वाढण्याची शक्यता आहे.

या प्रकरणी आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात ही समिती स्थापन करण्यात आली असून तेली यांच्यासह १० जणांची टीम या घटनेचा सखोल तपास करणार आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासला वेग येणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत असलेल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक नेमण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली होती. राज्य सरकारने गुन्ह्याचा तपास बीड पोलिसांकडून नंतर गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग केला. परंतु कराडला शोधण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग कमी पडल्याची टीका झाल्यानंतर देशमुख हत्या प्रकरणात वेगाने तपास होण्यासाठी फडणवीस यांनी विशेष पथक नेमण्याचे ठरविले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलीस ठाणे, बीड येथे गु. र. क्र. ६३७/२०२४ भा.न्या.सं., कलम १४०(१), १२६(२), ११८(१), ३२४(४) (५), १८१(२), १९१(२), १९०, १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सी.आय.डी., पुणे यांच्या अध्यक्षतेखाली “विशेष तपास पथक” स्थापन करण्यात आले आहे. तसेच, बसवराज तेली यांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार सदर विशेष तपास पथकामध्ये खालील काही अधिकारी व अंमलदार यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती