उरण : उरण महिला सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था अंतर्गत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. २०२४ मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेअंतर्गत उरण च्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याकरिता मी उद्योजिका उरणची हा व्हाट्सअप ग्रुप महिलांसाठी सुरू करण्यात आला होता. उरण मधील अनेक महिला उद्योजिकांनी या ग्रुपमध्ये आपले लघुउद्योग, गृह उद्योग यांचे प्रमोशन केले व नक्कीच त्यातून त्यांना ग्राहक मिळण्यासाठी मदत झाली. ३ जानेवारी २०२५ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेने स्थापित केलेल्या मी उद्योजिका उरणची या व्हाट्सअप ग्रुपच्या वर्धापनदिनी उरणमधील उद्योजिका महिलांचे सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी उरण पोलीस स्टेशनच्या पीएसआय पद्मजा पाटील गोपनीय शाखेच्या पो. अधिकारी मानसी तांबोळी आणि पोलीस कॉन्स्टेबल बंधू यांची टीम उपस्थित होती .
रायझिंग डे च्या निमित्ताने उरण पोलीस स्टेशनने मार्गदर्शन केले. पोलिस पथकाच्या स्थापने निमित्त २ जानेवारी या आठवडाभर पोलीस स्टेशन अंतर्गत रायझिंग डे साजरा करण्याची प्रथा आहे असे या निमित्ताने समजले.संस्था उपक्रम कार्यकारिणी अध्यक्ष नीलिमा थळी, सचिव स्मिता पाटील उपध्यक्ष सीमा घरत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. नीलिमा थळी मॅडमनी सर्वांचे स्वागत केले . संस्थापिका गौरी देशपांडे यांनी कार्यक्रमाची प्रास्ताविक सादर केले आणि पीएसआय पद्मजा पाटील मॅडम यांनी महिलांना सायबर क्राईम व महिला सुरक्षितता बद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित महिला उद्योजिका चा पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांनी स्वबळावर स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून आपले अस्तित्व टिकविण्यासाठी प्रयत्न करत रहावे .
परंतु शिक्षणाचा वसा घेऊन स्त्री शक्ती जागर चालवत असताना आपली संस्कृती विसरता कामा नये या विचारांवर उपस्थित महिलांनी आपली मते व्यक्त केली. नवीन पिढीसाठी आजचा दिवस हा केवळ एक औपचारिक साजरा करण्यासाठी कॅलेंडर मध्ये दिलेला दिवस आहे अशी भावना व्यक्त करून नवीन पिढीच्या मुलींनी देखील आपले समाजाप्रती असलेली जबाबदारी लक्षात घेऊन महिला सक्षमीकरना करिता सदैव तत्परतेने पुढे येणं आवश्यक आहे असे मत सर्वानुमते देण्यात आले.
लवकरच संस्थेअंतर्गत साजरा होणाऱ्या महिला दिनाच्या मध्ये नवीन पिढीला आकर्षित करण्याकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.सदर कार्यक्रमात संस्था उपाध्यक्ष कल्याणी दूखंडे , सीमा घरत, गौरी मंत्री, अफशा मुकरी ,दीपा मुकादम , जोस्ना येरुंनकर , नाहिदा ठाकूर, प्रगती दळी , उपक्रम कार्यकारिणी नीलिमा थळी , स्मिता पाटी, उरणच्या उद्योजिका विदूला कुलकर्णी, पूनम पाटेकर उपस्थित होत्या.संस्थापिका गौरी देशपांडे यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.