सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 जिल्हा

पौराणिक व ऐतिहासिक स्थळाचे अस्तित्वात नष्ट होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी केला विरोध.

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी)    07-01-2025 17:07:35

उरण : रेवस ते  रेड्डी सागरी महामार्गावरील करंजा ते रेवस सागरी सेतु च्या जागेच्या मोजणी संदर्भात पवन चांडक-उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या उपस्थितीत तहसिल ऑफिस उरण येथे दिनांक ७/१/२०२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला प्रांत अधिकारी पवन चांडक, MSRDC चे बोराडे साहेब, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नरेश पवार, चाणजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे,माजी सभापती ऍड सागर कडू,माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, करंजा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष कल्पेश थळी, उपाध्यक्ष देवीदास थळी मेघनाथ थळी मुळेखंड,कोंढरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सदर बैठकीत ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या द्रोणागिरी पर्वत परिसरातून जाणाऱ्या मार्गाला ग्रामस्थांकडून कडाडून विरोध दर्शविण्यात आला.

उरण तालुक्यातील करंजा येथे समुद्रकिनारी द्रोणागिरी पर्वत वसलेला असून या द्रोणागिरी पर्वताला धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक महत्व आहे. द्रोणागिरी किल्ला, डोंगरावरील द्रोणागिरी मातेचे मंदिर हे ऐतिहासिक वारसा आहेत. उरणची ओळख आहे. त्यामुळे हे महत्वाचे वारसे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, मंदिरे नवीन सागरी सेतू मार्गामुळे नष्ट होणार आहेत. त्यामुळे विकास कामांना विरोध नाही मात्र द्रोणागिरी पर्वत व द्रोणागिरी मातेचे मंदिर वाचले पाहिजे. त्यांचे अस्तित्व टिकले पाहिजे अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.

करंजा रेवस सागरी सेतुला तमाम उरण आणि करंजा गावातील जनतेचा पाठिंबा आहे .परंतु ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व प्राप्त असलेल्या द्रोणागिरी पर्वताला धक्का न लावता हा मार्ग करण्यात यावा ही महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. 

  - सचिन रमेश डाऊर. सामाजिक कार्यकर्ता,उरण.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती