सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 ब्रेकिंग न्यूज :
 राज्य

उरण नगर परिषदेच्या माँ साहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी)    17-01-2025 16:51:45

उरण : उरण नगर परिषदेच्या माॅं साहेब मीनाताई ठाकरे ग्रंथालयात दि.१ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ हा पंधरवडा " वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  समिर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहाने उरण नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक  अनिल जगधनी , ग्रंथपाल  संतोष पवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभा करिता प्रमूख मार्गदर्शक हणून प्रा. राजेंद्र मढवी, प्रा. निरंतर सावंत, प्रा. हुसेन खान, प्रा. नाहिदा सिद्धिकी, श्रद्धा गोडे, जयेश वत्सराज उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल संतोष पवार "वाचन संस्कृतीचे महत्त्व काल आज आणि उद्या" या विषयावर वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन, वाचन कौशल्य कार्यशाळा,वाचन कौशल्य आणि माझ्या मनातील ग्रंथालय या विषयावर चित्रकला स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमांचे उद्घाटन उरण नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अनिल जगधनी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्पर्धांचे परिक्षण झुंजार मतचे संपादक  अजित पाटील, आणि प्रा. निरंतर सावंत यांनी केले. या प्रसंगी अनिल जगधनी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या बौद्धिक विकासासाठी वाचन अतीशय महत्त्वाची बाब आहे "वाचाल तर वाचाल" या विषयावर बहुमोल असे मार्गदर्शन केले.या स्पर्धांमध्ये उरण मधील विविध शाळा महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्याच बरोबर सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपल्या सकारात्मक प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या.

या स्पर्धांमध्ये वाचन कौशल्य या स्पर्धेत रोटरी स्कूल मधील कु काव्या नरेश म्हात्रे गट क्रं. १ , की. नम्रता सुर्यवंशी गट क्र. २  आणि मुनीर मुकादम गट क्र. ३यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु. काव्या नरेश म्हात्रे, गट क्र. १, कु. विशाखा राहूल भालेराव, गट क्र. २, कु. केतना गुप्ता या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. चित्रकला स्पर्धा कु. लक्ष्मी रावत गट क्र. १,  वर्गांना शेख गट क्र. २, सना जहांगीर आली, गट क्रमांक ३ या विद्यार्थ्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. या संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि संपूर्ण स्टाफ तसेच महत्वाचे म्हणजे ग्रंथालयाचे सहाय्यक कर्मचारी जयेश वत्सराज आणि ग्रंथालयातील सर्व विद्यार्थ्यांनी बहूमोल असे सहकार्य केले त्यामुळेच या स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या.

माननीय वाचक वर्ग, विद्यार्थी यांनी प्रतिक्रिया देताना अशा अपेक्षा केल्या की, अशा स्पर्धा आणि कार्यक्रम नियमित होणे आवश्यक आहे.अशी अपेक्षा ग्रंथालयाचे नियमित वाचक सिटीझन स्कूल , काॅलेज , रोटरी इंग्लीश मिडीयम स्कूल, जनरल एज्युकेशन ईंस्टिट्युशन या संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती